मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलियाच्या Darlingsसिनेमाच्या स्क्रिनिंगला मराठमोळ्या संतोष सईची खास उपस्थिती; फोटो आला समोर

आलियाच्या Darlingsसिनेमाच्या स्क्रिनिंगला मराठमोळ्या संतोष सईची खास उपस्थिती; फोटो आला समोर

अभिनेता संतोष जुवेकर आणि सई ताम्हणकर यांनी आलिया भट्टच्या डार्लिंग सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. दोघांचे फोटो समोर आलेत.

अभिनेता संतोष जुवेकर आणि सई ताम्हणकर यांनी आलिया भट्टच्या डार्लिंग सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. दोघांचे फोटो समोर आलेत.

अभिनेता संतोष जुवेकर आणि सई ताम्हणकर यांनी आलिया भट्टच्या डार्लिंग सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. दोघांचे फोटो समोर आलेत.

  मुंबई, 2 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची पहिली वहिली निर्मिती असलेला 'डार्लिंग' हा सिनेमा येत्या 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  सिनेमाचा खतरनाक ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. ब्लॅक कॉमेडी ड्रामा असलेल्या डार्लिंग सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं. सिनेमाला आलियासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र याच मराठमोळ्या कलाकारांनीही सर्वांचं लक्ष वेधलं. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकरनं डार्लिंग सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी खास उपस्थिती लावली होती. स्क्रिनिंग दरम्याने दोघांचे फोटो समोल आले आहेत. डार्लिंग सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि शेफाली शाह या मुख्य भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर, अजित केळकरही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अजित केळकर म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील बंडू काका. दोन मराठी कलाकारांना सिनेमात पाहून मराठी प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे. संतोष आणि अजित यांची छोटीशी झलक सिनेमाच्या ट्रेलरमधून  प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. अभिनेते अजित सिनेमात एका आजोबांची भूमिका करत आहेत. तर अभिनेता संतोष जुवेकर पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हेही वाचा - Kushal Badrike: कुशलला पडला मित्रांचा चोप; विनोदवीराने असं केलं तरी काय? बघा VIDEO अभिनेते अजित केळकर यांच्याविषयी सांगायचं तर अजित केळकर यांनी विद्या बालनच्या 'जलसा' या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका साकारली होती. 'तुम्हारी सुलु' हा चित्रपट तर 'सिटी ऑफ ड्रिम्स', 'गिल्टी माइंड्स' यांसारख्या वेब सिरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे.
  अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात एक वेगळी भूमिका साकारणार आहे याआधी त्यानं 'भोसले' या हिंदी सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या स्क्रिनिंगला संतोष हाफ पँन्ट, बॉडी आणि ओपन शर्टमध्ये दिसला. अभिनेता संतोष जुवेकरनं केस देखील कापलेले दिसत आहेत. त्याच्या या नव्या लुकला देखील त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. तर अभिनेत्री सई स्टायलिश अंदाजात आली होती. अभिनेत्री सई ताम्हणकर डार्लिंग सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कुठेही दिसली नाही. मात्र सिनेमाच्या स्क्रिनिंगला सई पाहून अनेकांनी सई देखील सिनेमाचा भाग आहे का असा प्रश्न विचारला आहे. मात्र याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood News, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या