मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kushal Badrike: कुशलला पडला मित्रांचा चोप; विनोदवीराने असं केलं तरी काय? बघा VIDEO

Kushal Badrike: कुशलला पडला मित्रांचा चोप; विनोदवीराने असं केलं तरी काय? बघा VIDEO

अभिनेता कुशल बद्रिकेला त्याच्या मित्रांनी चांगलाच चोप दिलाय. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेता कुशल बद्रिकेला त्याच्या मित्रांनी चांगलाच चोप दिलाय. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेता कुशल बद्रिकेला त्याच्या मित्रांनी चांगलाच चोप दिलाय. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  मुंबई, 2 ऑगस्ट: अभिनेता विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर त्यांची चांगलीच फॅन फॉलोविंग आहे. कुशल त्याच्या क्रिएटिव्ह पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असतो. कुशल सध्या चला हवा येऊ द्यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र आणखी नव्या अवतारात कुशल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या त्याच्या नव्या कामाच्या स्क्रिप्टिंगचं काम सुरू आहे. मात्र स्क्रिप्ट वाचताना कुशल असं काही बोलून गेला आणि मित्रांनी शिव्यांच्या प्रसादासकट चांगलाच चोप दिलाय. कुशलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका गाडीत अभिनेता कुशलसह संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने बसले आहेत. सगळ्यांच्या हातात स्क्रिप्ट आहे आणि कुशल स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करतो. कुशल त्याच्या कुशलतेने स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करतो. मस्त वाचन सुरू असताना कुशल काहीतरी भलतचं बोलून जातो आणि हे ऐकून संतोष अभिजीत आणि विजू भडकतात आणि कुशलला गाडीतच चोप देतात. हा धम्माल व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरलेलं नाही.  कुशलला देखील मित्रांनी त्याला का मारलं हे कळलेलं नाही. कुशलनं व्हिडीओ शेअर करत 'मला तर काय कळलंच नाही, यांनी मला का मारलं ते', असं म्हटलं आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अरुंधती देणार संजनाला देशमुखांचा पिढीजात हार; मंगळागौरीसाठी कुटुंब येणार एकत्र
  कुशलचा व्हिडीओ कॉमेडी असला तरी हे त्यांच्या नवीन कामाचं प्रमोशन आहे.  विजू माने दिग्दर्शित 'स्ट्रगलर साला सीझन 3' प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे.  स्ट्रगलर साला कॉमेडी मराठी वेब सीरिज असणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विजू मानेंनी विनोदवीरांना एकत्र करुन काहीतरी नवीन प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही वेब सीरिज पुढच्या काही दिवसातच प्रदर्शित होईल. दरम्यान कुशलनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं म्हटलंय, 'स्ट्रगलर सालामधून बंडखोर झालेले हेच दिघे'. तर दुसऱ्या युझरनं विजू मानेंचं कौतुक करत, 'विजू माने सर मी तुमच्या ऍक्टिंगचा प्रचंड मोठा फॅन आहे. तुमच्या तोंडातून येणारे अपशब्द खूप एन्जॉय करतो'. तर आणखी एका युझरनं, 'कुशलची स्क्रिप्ट वाचायची पद्धत बघून, 'खूपच कुशलतेने स्क्रिप्ट वाचली गेली आहे!', असं म्हटलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या