जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता

पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता

पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ‘पु.ल देशपांडे’ अर्थात भाईंच्या जीवनावर आता छोट्या पडद्यावर एक मालिका भेटीला येतेय. ही मालिका मराठी नसून हिंदी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 26 जून : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ‘पु.ल देशपांडे’ अर्थात भाईंच्या जीवनावर आता छोट्या पडद्यावर एक मालिका भेटीला येतेय. ही मालिका मराठी नसून हिंदी आहे आणि यात पुल देशपांडे यांच्या भूमिकेसाठी मात्र मराठी अभिनेत्याची निवड झालीय. लोकप्रिय अभिनेते संजय मोने यात पुलंच्या भूमिकेत दिसतील. हेही वाचा अमिताभ आणि माझ्या यशामागे अनेक स्त्रिया-शत्रुघ्न सिन्हा

    किम जोंग यांनी उत्तर कोरियात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर घातली बंदी !

    महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे ‘नमुने’ असं या मालिकेचं नाव असून ‘सोनी सब’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर ही मालिका आधारित आहे. यामध्ये संजय मोनेंसह सुबोध भावे आणि इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज दिसणार आहे. नुकतीच या मालिकेच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात झाली असून आणखी काही मराठी चेहरे यात झळकतील अशी चर्चा आहे. यानिमित्ताने मराठीसह अमराठी प्रेक्षकांनासुद्धा पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरील कथा छोट्या पडद्यावर पाहता येईल. 8 नोव्हेंबर 2018पासून पुलंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. त्यानिमित्त आता व्यक्ती आणि वल्ली यावर येतोय सिनेमा. महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत, तर पुलंच्या भूमिकेत आहे ‘वायझेड’फेम सागर देशमुख. तर इरावती हर्षे साकारणार आहे सुनीताबाई. या सगळ्यांना रूपरंग देणार आहेत विक्रम गायकवाड.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात