Elec-widget

अमिताभ आणि माझ्या यशामागे अनेक स्त्रिया-शत्रुघ्न सिन्हा

अमिताभ आणि माझ्या यशामागे अनेक स्त्रिया-शत्रुघ्न सिन्हा

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या यशामागे एक नाही तर अनेक स्त्रिया होत्या, ऐकून धक्का बसला का? पण हे गंमतीने सांगितलंय शत्रुघ्न सिन्हा यांनी न्यूज 18 इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत.

  • Share this:

मुंबई, 26 जून : अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या यशामागे एक नाही तर अनेक स्त्रिया होत्या, ऐकून धक्का बसला का? पण हे गंमतीने सांगितलंय शत्रुघ्न सिन्हा यांनी न्यूज 18 इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत. अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा चाहतावर्ग होता, ज्यात महिलांचं प्रमाण जास्त होतं. हे दोघंही यशाच्या शिखरावर असताना त्यांच्यामागे अनेक महिला चाहत्या ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपडत असत.

शत्रुघ्न सिन्हा यांना अनेक मैत्रिणीही होत्या आणि त्या मैत्रिणींशी ओळख करून अमिताभ बच्चन यांनी अनेक मैत्रिणी माझ्यापासून चोरल्या, असा मजेदार किस्सादेखील शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितला. ग्लॅमर वर्ल्डमधील एकापेक्षा एक किस्से सांगत असताना शॉटगन सिन्हा यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला चार्मिंग अंदाज आणि स्त्रियांवर भुरळ पाडण्याची अनोखी शैली यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2018 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...