संजय दत्तने संगितली तुरुंगातील शिक्षा कमी करण्याची युक्ती, पाहा VIDEO

संजय दत्तने संगितली तुरुंगातील शिक्षा कमी करण्याची युक्ती, पाहा VIDEO

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्तनं त्याच्या तुरुंगातील आयुष्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : अभिनेता संजय दत्त सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘पानीपत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त बीझी आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायक अहमदशाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संजय दत्तनं नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील संजय दत्तचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला गेला आहे. याशिवाय यात कपिल शर्मानं संजय दत्तला तो जेलमध्ये होता त्या काळातील त्याच्या जीवनाविषयी काही प्रश्न विचारले.

संजय दत्तचा हा व्हिडीओ सोनी टीव्हीनं त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा संजय दत्तला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावेळी कपिल शर्मा म्हणाला की संजूमध्ये, तुरुंगात असताना तू कशाप्रकारे रेडिओवर प्रोग्राम सुरू केला होता. कसं फर्निचर बनवत असे. न्यूज पेपरचे लिफाफे बनवत असे. हे सर्व तु किती दिवसात शिकलास. यावर संजय दत्त म्हणाला, हे सर्व शिकायला मला बराच वेळ लागला. कारण जेव्हा तुम्ही जेलमध्ये असता त्यावेळी काम करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला शिक्षा कमी करायची असेल तर तुम्हाला जेलमध्ये काम करावं लागतं.

फिटनेसमध्ये कतरिनाची स्टार अभिनेत्यांना टक्कर, VIDEO पाहून बॉलिवूडकर हैराण

संजय दत्त पुढे म्हणाला, मला एक पेपर बॅग तयार करण्याचे 10 पैसे मिळत असत. मी ते सर्व पैसे साठवून ठेवले होते. यासाठी की जेव्हा माझी बहिण मला राखी बांधण्यासाठी येईल तेव्हा मी तिला ते देऊ शकेन. संजय दत्तचं हे उत्तर ऐकल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. यावेळी संजय दत्तच्या चेहऱ्यावर असलेलं हास्य आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी भावुक क्षणांसोबतच बराच मस्ती-मजाक पाहायला मिळाला.

अभिनेत्रीची काढली छेड, जाब विचारताच रोमिओनं केली मारहाण, PHOTO VIRAL

संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेला पानीपत हा सिनेमा आशुतोष गोवारिकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

VIDEO: अर्जुन कपूरचा फोटो पाहून लाजली मलायका अरोरा आणि म्हणाली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 05:44 PM IST

ताज्या बातम्या