मुंबई, 05 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सिनेमांसोबतच तिच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखली जाते. प्रत्येक सिनेमात ती तिचं वेगळेपण जपते. तिचा वेगळा अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस व्हिडीओची खूप चर्चा आहे. ज्या व्हिडीओमुळे बॉलिवूडचे स्टार कलाकार सुद्धा हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये कतरिना फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्यांनाही टक्कर देताना दिसत आहे. कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जिमध्ये घाम गाळताना दिसत आहे. पण तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर बॉलिवूडच्या स्टार कलाकारांनीही धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओमध्ये कतरिना फक्त तिच्या जिम पार्टनर्सनाच नाही तर तिच्या ट्रेनरलाही टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहे. आजपर्यंत फिटनेससाठी कठीण एक्सरसाइझ करताना अभिनेत्यांना पाहिलं होतं मात्र अशाप्रकारे एक्सरसाइझ करणारी कतरिना पहिलीच अभिनेत्री आहे. VIDEO: अर्जुन कपूरचा फोटो पाहून लाजली मलायका अरोरा आणि म्हणाली…
कतरिनानं एका मागोमाग एक असे 4 व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये ती वर्कआउट करताना दोन पुरुषांना कम्पिट करताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती अवजड सामान हातात घेऊन वर्कआउट करताना दिसत आहे. या सर्वातील खास गोष्ट अशी की एकाही व्हिडीओमध्ये तिची एनर्जी कमी जास्त झालेली दिसत नाही. हे व्हिडीओ कतरिनाच्या फिटनेसचं प्रमाण देत नाहीत तर दुसऱ्यांसाठी प्रेरणा सुद्धा आहेत. घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं होतं, मलायकानं केला खुलासा कतरिनाच्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. फराह खाननं लिहिलं, ‘मी फक्त तुला पाहत राहिले.’ याशिवाय श्रद्धा कपूरनं शॉकिंग इमोजी पोस्ट केला तर नर्गिस फाकरीनं ‘वॉव’ अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय कतरिनाच्या चाहत्यांनीही तिच्या या व्हिडीओंचं कौतुक केलं आहे. कतरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच ती अक्षय कुमारच्या सूर्यवंशी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख-सलमान-आमिरमुळे उद्ध्वस्त झालं या HOT अभिनेत्रीचं करिअर