मुंबई, 15 एप्रिल : कधी काळी सिने इंडस्ट्रीतील बॅड बॉय म्हणून ओळखला जाणाऱ्या संजय दत्तनं त्यांच्या लाइफमध्ये बरेच उतार चढाव पाहिले आहेत. 2018 मध्ये त्याचा बायोपिक आला. या सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं जोरदार कौतुक झालं. पण यासोबतच संजय दत्तच्या आयुष्यातले सर्व खुलासे सुद्धा झाले. हा सिनेमा रिलीज होण्याआधी एका मुलाखतीत रणबीर सिंहनं संजयची लाइफ एखाद्या फिक्शनपेक्षा कमी नाही असं म्हटलं होतं. दरम्यान सध्या लॉकडाऊनच्या काळात संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यानं आपल्या ड्रग्सच्या नशेबाबत आतापर्यंत सर्वात मोठा खुलासा केला आहे. संजू सिनेमात संजय दत्तच्या लाइफचा तो काळही दाखवण्यात आला आहे. ज्यावेळी त्याला ड्रग्सच्या नशेची सवय झाली होती. आता संजयनं याबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये संजय दत्तचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. संजयचा हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. जो चंदीगढ युनिव्हर्सिटीमध्ये संजय दत्तनं दिलेल्या एका स्पीचची क्लिप आहे. प्रसिद्ध निर्मात्याची दुसरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, याआधी आला होता हार्टअटॅक
या व्हिडीओमध्ये संजय दत्त त्याच्या ड्रग्सच्या नशेबद्दल सांगताना दिसत आहे. संजय सांगतो, ‘सकाळची वेळ होती आणि मला खूप भूक लागली होती. त्यावेळी माझ्या आईचं निधन झालं होतं. मी आमच्या नोकराला सांगितलं की मला खायला काहीतरी दे. त्यावर तो म्हणाला, बाबा तुम्ही दोन दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही. फक्त झोपून होतात. मी बाथरुममध्ये गेलो होतो. मी तुम्हाला पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी मरणाच्या अवस्थेत पडलेले होता. तुमच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होतं.’ 25 हजार कामगारांना मदत केल्यानंतर मालेगावच्या महिलांसाठी सलमान ठरला देवदूत
संजय पुढे सांगतो, मी नोकराचं सर्व बोलणं ऐकलं आणि घाबरुन गेलो आणि सकाळी 7 वाजता मी माझ्या वडीलांकडे गेलो. त्यांना म्हटलं मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला ड्रग्सची नशा करायची सवय झाली आहे. मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या वडीलांनी माझी मदत केली. त्यांनी मला अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात दाखल केलं. त्याठिकाणी मी 2 वर्षं घालवली. सुरुवातीच्या काही दिवसांत माझ्या डोक्यात पुन्हा एकदा ट्राय करावं का असे विचार येत होते. मात्र नंतर मी स्वतःवर कंट्रोल करायला शिकलो. बादशाहच्या ‘गेंदा फूल’वर या मुलीचा VIDEO VIRAL, जॅकलिनलाही टक्कर देतील अशा अदा संजय दत्तनं पुढे सांगितलं, जेव्हा मी अमेरिकेतून परत आलो. त्यावेळी माझा जुना ड्रग्स पेडलर पुन्हा मला भेटायला आला. मला माझ्या नोकरानं सांगितलं. तुम्हाला कोणतरी भेटायला आलं आहे. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. त्यावेळी मी पाहिलं तर तो ड्रग्स पेडलर होता. त्यानं ड्रग्स माझ्या हातात दिलं आणि म्हणाला बाबा हा नवा माल आहे तुझ्यासाठी आणला आहे. तो एक क्षण होता ज्यावेळी माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता. मी माझ्या वडीलांना ड्रग्स न घेण्याचं वचन दिलं होतं आणि मी ते पाळलं. (संपादन : मेघा जेठे.)

)







