मुंबई, 12 एप्रिल : बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. संजय दत्तबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान संजय जखमी झाला आहे. संजय सध्या त्याच्या आगामी ‘केडी - द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. या चित्रपटात बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना संजय जखमी झाला आहे.
शरीराच्या या भागांना दुखापत संजय दत्तबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार, तो बॉम्बस्फोटाच्या दृश्याचे शूटिंग करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. संजय फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत होता. याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. या बातमीनंतर संजयचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. ‘त्यांचे अफेअर्स म्हणजे फक्त वन नाईट स्टँड…’ ऋषी कपूर यांच्याविषयी बायकोनं केलेला मोठा खुलासा ‘KGF Chapter 1’ आणि ‘KGF Chapter 2’ नंतर संजय दत्त पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’मध्ये संजय दत्त अॅक्शन हिरो ध्रुव सर्जासोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच ध्रुव सर्जा यांच्या ‘मार्टिन’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
संजय दत्तचा चित्रपट KD: The Devil प्रेम यांनी दिग्दर्शित केला आहे आणि KVN बॅनरखाली निर्मिती केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर संजय दत्तला ‘हेरा फेरी 4’ मध्ये कास्ट केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका निगेटिव्ह असणार आहे. यात संजय दत्त अंध व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या व्यक्तिरेखेत एक ट्विस्ट आहे. संजय दत्तच्या एंट्रीमुळे हा चित्रपट अधिक रंजक होणार आहे. गेल्या वर्षी तो ‘KGF 2’ मध्ये रॉकी भाई विरुद्ध दमदार फॉर्ममध्ये दिसला होता. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या चित्रपटातही त्याने दमदार अभिनयानं कमाल केली होती. ‘शमशेरा’ची जादू चालु शकली नसली तरी सर्वांनी संजय दत्तचे कौतुक केले. आता पुन्हा एकदा तो नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अखेरचा रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. संजय लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात रवीना टंडनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.