जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'त्यांचे अफेअर्स म्हणजे फक्त वन नाईट स्टँड...' ऋषी कपूर यांच्याविषयी बायकोनं केलेला मोठा खुलासा

'त्यांचे अफेअर्स म्हणजे फक्त वन नाईट स्टँड...' ऋषी कपूर यांच्याविषयी बायकोनं केलेला मोठा खुलासा

नितू कपूर - ऋषी कपूर

नितू कपूर - ऋषी कपूर

नितु कपूर यांची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होतेय ज्यामध्ये त्यांनी ऋषी कपूर यांच्या अफेअर्सबद्दल कबुली दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल :  नितु कपूर आणि ऋषी कपूर हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडपं होतं. या दोघांची पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतरही त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचं रूपांतर प्रेमात होत दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कपूर घराण्याच्या प्रथेप्रमाणे नितु यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. पण आता ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाल्या आहेत. अनेकदा नितु आणि ऋषी कपूर यांच्यात मतभेत असल्याच्या चर्चा होत असत. पण यावर दोघांपैकी कोणीही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. आता नितु सिंग यांची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होतेय ज्यामध्ये त्यांनी ऋषी कपूर यांच्या अफेअर्सबद्दल कबुली दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नितु म्हणाल्या होत्या की, ‘ऋषीचे दुसरीसोबत अफेअर असल्याचे पकडले गेले आहे का, याचा अर्थ काय? मी त्याला माझ्यासमोर अनेकदा दुसऱ्यांसोबत फ्लर्ट करताना पाहिले आहे. जेव्हाही त्याचं अफेअर असतं तेव्हा मला सगळ्यात आधी कळतं. पण, मला माहित आहे की त्यांचे अफेअर्स फक्त वन नाईट स्टँड पुरते मर्यादित असतात. Suhana Khan: बड्या अभिनेत्रींना मागे टाकत शाहरुखच्या लेकीला मिळाली मोठी संधी; नेटकरी म्हणाले, ‘ही स्टारकिड आहे म्हणून….’ नितु कपूर पुढे म्हणाल्या होत्या कि, ‘दोन वर्षांपूर्वीपर्यंत मी यासाठी त्याच्याशी भांडत असे. पण, आता कदाचित मी पूर्वीपेक्षा जास्त समजूतदार झाले आहे, त्यामुळे त्याच्या अफेअरला माझी हरकत नाही. मी बघत असते की त्याचं अफेअर किती काळ टिकेल.’

News18

नितु कपूर पुढे म्हणाल्या, ‘त्यांना एकच गोष्ट खटकत होती की मी त्यांच्याशी कधी भांडत नाही. मी फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष करते  किंवा काही दिवस त्यांच्यापासून दूर राहते. आम्हाला एकमेकांवर  खूप विश्वास आहे. मला माहित आहे की त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, त्यामुळे मी या गोष्टींचे कोणतेही टेंशन घेत नाही. त्यांच्यासाठी हा फक्त फॅन्सी पास टाइम आहे. ते माझ्यावर खूप अवलंबून आहेत, ते मला कधीही सोडू शकत नाहीत, ते माझ्याशिवाय जगू शकत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

नितु कपूर यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. ऋषी कपूर यांच्या अफेअरला त्यांच्या बायकोनं दिलेले समर्थन चुकीचे आहे असं काही जण म्हणतायत तर दुसरीकडे, काही नेटकरी नितु कपूर यांच्या या प्रतिक्रियेचे वर्णन फसवणूकीला प्रोत्साहन देणारे आणि लग्नाच्या व्यवस्थेला भ्रष्ट करणारे म्हणून करत आहेत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात