जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Samir Chaoughule : प्रेक्षकांना खळखळून हसवताना समीर चौघुलेंकडून झाली मोठी चूक; मागावी लागली सर्वांसमोर माफी

Samir Chaoughule : प्रेक्षकांना खळखळून हसवताना समीर चौघुलेंकडून झाली मोठी चूक; मागावी लागली सर्वांसमोर माफी

समीर चौघुलेंनी मागितली माफी

समीर चौघुलेंनी मागितली माफी

रेक्षकांचं मनोरंजन करत असताना अभिनेते समीर चौघुले यांच्याकडून अशी एक चुक झाली की ज्यामुळे त्यांना सर्वांसमोर जाहीर माफी मागण्याची वेळ आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जून :  गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे समीर चौघुले सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या एकाहून एक धम्माल स्किस्टमधून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. विनोदाचं कमाल टायमिंग आणि उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या समीर चौघुले यांचे हास्यजत्रेमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आणि त्यातील विनोदवीर हे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाले आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कोराना काळातही समीर चौघुले आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या टीमनं प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन केलं. दरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना अभिनेते समीर चौघुले यांच्याकडून अशी एक चुक झाली की ज्यामुळे त्यांना सर्वांसमोर जाहीर माफी मागण्याची वेळ आली. अभिनेते समीर चौघुले आणि अभिनेत्री शिवाली परब ही जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील  बापलेकीची धम्माल जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांची कॉमेडी प्रेक्षक एन्जॉय करतात. समीर चौघुले यांचं शिवालीबरोबरचं तारपा नृत्य तर चांगलंच फेमस झालं आहे. पण याच तारपा नृत्यानं समीर चौघुले यांना गोत्यात आणलं आहे. एका स्किटमध्ये समीर चौघुले तारपा नृत्य करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला असून या नृत्यातून आदिवासी समाजाची खिल्ली उडवल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. या प्रकरणी समीर चौघुले यांनी पत्रकार परिषदेत सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. हेही वाचा -  रीलही तिच आणि रिअलही तिच; अमृता आणि ज्योती सुभाष या मायलेकीचं आडनाव काय माहितीये? आदिवासी समाजाकडून समीर चौघुले यांचा तारपा नृत्य करणारा व्हिडीओ शेअर त्याचा निषेध करण्याचा आला. आम्ही या प्रकाराचा निषेध करीत आहोत. समीर चौघुले आणि त्यानंतर कोणीही असा नृत्य प्रकार करून आमच्या नृत्याचा असा  अवमान करणार नाही अशी खबरदारी आम्ही घेऊ, असं आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.  त्यानंतर समीर चौघुले यांची भेट घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेत समीर चौघुले यांना झालेल्या चुकीची माफी मागितली.

जाहिरात

तारपा नृत्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्यानं समीर चौघुलेंनी माफी मागितली ते म्हणाले,   “मी एक स्किट केलं होतं त्याची 30 सेकंदाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात मी तारपा नृत्य करत होतो असं सांगितलं होतं. पण त्यात मी तारपा नृत्य केलं नव्हतं.  माझ्या लक्षात आलं की, माझ्या आदिवासी बंधु आणि भगिनींच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी या झालेल्या प्रकाराची माफी मागतो. हा प्रकार पुन्हा होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो”.

News18लोकमत
News18लोकमत

समीर चौघुले पुढे म्हणाले, “हा प्रकार अनावधानाने झाला होता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आणि कधीच नसतो. हा हेतू भविष्यातही नसेल”. अशाप्रकारे समीर चौघुले यांनी झालेल्या प्रकारावर माफी मागत आपली बाजू पत्रकार परिषदेत मांडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात