कंगना 'या' राजकीय नेत्याच्या बायोपिकसाठी करतेय परीक्षेसारखी तयारी

कंगना परिक्षेचा अभ्यास मनलावून करतेय की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांनी विचारलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 03:00 PM IST

कंगना 'या' राजकीय नेत्याच्या बायोपिकसाठी करतेय परीक्षेसारखी तयारी

मुंबई 1 नोव्हेंबर : आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना रनौतला (Kangana Ranaut) बॉलिवूडमध्ये 'क्वीन' या नावानं ओळखलं जातं. कायम कुणाशीतरी वाद घालणारी कंगना सध्या एका चिपटाच्या तयारीत पूर्ण बुडून गेलीय. हा चित्रपट आहे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता (Jayalalitha Biopic) यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी’ (Thalaivi)  या चित्रपटासाठी ती सध्या जीव तोडून अभ्यास करत आहे. ‘थलाइवी’च्या तयारीसाठी कंगना सध्या आपल्या मनालीमधल्या घरी आहे. दिवाळीही तिने तिथल्याच बंगल्यात साजरी केलीय. ‘थलाइवी’ची एक टीम सध्या मनालीतच असून कंगना त्यांच्यासोबत दररोज या विषयाचा बारकाईने अभ्यास करतेय.

सध्या शेवटच्या टप्प्याची तयारी सुरू असून जयललीतांच्या अतिशय बारीक-सारीक लकबी आणि हालचालींचा अभ्यास करण्यात ती सध्या व्यस्त आहे. ‘थलाइवी’च्या टीमने कंगनाचा एक फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो फोटो व्हायरल झाला असून कंगना परिक्षेचा मनलावून अभ्यास करतेय की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांनी विचारलाय. हातात कागद पेन्सिल घेऊन सोफ्यावर कंगना वहित नोट्स काढत आहे असा तो फोटो आहे. या चित्रपटासाठी कंगनाला खास मेकअप करावं लागणार असून त्यासाठी दररोज तिला काही तास द्यावे लागणार आहेत.

या चित्रपटाच्या शुटींगचा पहिला टप्पा कर्नाटकात पार पडणार आहे. हा चित्रपट तामिळ शिवाय अनेक भाषांमध्येही रिलीज होणार आहे. ‘थलाइवी’ची चर्चा ही फक्त बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय क्षेत्रातही या चित्रपटाविषयी आणि कंगनाच्या भूमिकेविषयी जोरदार चर्चा आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 11:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...