मुंबई, 2 नोव्हेंबर : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’च्या प्रमोशनची तयारी करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. पण त्यानंतर लगेचच सलमाननं त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगची घोषणा केली आहे. सलमाननं पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा सिनेमा ‘राधे’ या सिनेमाचं शूटिंग कालपासून सुरुवात केली. या सिनेमात सलमान नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. राधे सिनेमाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. तर भारत सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दिशा पाटनी या सिनेमात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसाणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या सिनेमाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. सलमाननं या सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्याची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली. कंगना ‘या’ राजकीय नेत्याच्या बायोपिकसाठी करतेय परिक्षेसारखी तयारी या सिनेमातील स्टार कास्टसोबतचा फोटो शेअर करत सलमाननं लिहिलं, ‘…आणि प्रवासाला सुरुवात झाली, राधे ईद 2020’ सलमाननं शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रभुदेवा, रणदीप हुड्डा, श्रॉफ, खान, पाटनी आणि निर्माता अतुल अग्निहोत्री दिसत आहेत.
सलमानचा ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. सलमान दरवर्षी ईदच्या दिवशी त्याचा सिनेमा रिलीज करतो. खरं तर या सिनेमाच्या ऐवजी पुढच्या वर्षी सलमानचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘इन्शाअल्लाह’ रिलीज होणार होता. या सिनेमा अलिया भटसोबत तो स्क्रीन शेअर करणार होता मात्र काही कारणानं हा सिनेमा शूट सुरू होण्याआधीच बंद झाला. त्यामुळे आता पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी सलमानचा राधे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूज करणार होती आत्महत्या, केले स्फोटक खुलासे
या सिनेमाविषयी सलमाननं सोशल मीडियावर लिहिलं, तुम्हीच विचारलं होतं ना दबंग 3 नंतर काय? काय आणि कधी? हे घ्या उत्तर राधे ईद. याशिवाय सलमानच्या ‘वॉन्टेड 2’ चर्चाही सुरू आहेत. वॉन्टेड हा सिनेमा तेव्हाचा आहे ज्यावेळी त्याचं करिअर बुडालं होतं. पण त्यावेळी सलमाननं वॉन्टेड सिनेमातून दमदार कमबॅक केलं होतं. त्यानंतर आता या सिनेमात सलमान पुन्हा एकदा धाकड लुकमध्ये दिसणार आहे. सदाबहार अभिनेत्री रेखासारख्याच यशस्वी आहेत या तिच्या 6 बहिणी =========================================================== VIDEO : ‘नेत्यांना सुबुद्धी देवो’ भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या…