मुंबई, 08 नोव्हेंबर : तमाम तरुणांची नॅशनल क्रश म्हणजेच साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सध्या चर्चेत आहे. पुष्पा सिनेमातील ‘ऊ अंटावा’ या गाण्यात समांथानं केलेल्या हटके डान्समुळे ती चर्चेत आली. तर लवकरच समांथाचा ‘यशोदा’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. समांथानं तिच्या आजवरच्या करिअरमध्ये चांगल्या फिल्म्स केल्या आहेत. समांथा केवळ तिच्या चांगल्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या समांथानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिनं तिच्या आजाराविषयी माहिती दिली. समांथा काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी सामना करत आहे. समांथाचा यशोदा हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या समांथा बिझी आहे. प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत समांथानं तिच्या आजाराविषयी अपडेट दिली. बोलता बोलता समांथाला अश्रू अनावर झआले.समांथाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून अभिनेत्रीबद्दल काळजी आणि शुभेच्छा येत आहेत. हेही वाचा - VIDEO : भर स्टेडियममध्ये ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन् क्रिकेटरनं केलं असं काही की… समांथा गेल्या काही महिन्यांपासून मायोसिटिस नावाच्या आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. सोबत सिनेमाचं डबिंग करता करता ट्रिटमेंट सुरू असल्याचा फोटो तिनं शेअर केला होता. यात समांथाच्या हाताला सलाइन लावलेली दिसत आहे.
#Samantha opens up about handling her health issues. #Yashoda #YashodaTheMovie pic.twitter.com/r2Xc3uUuKT
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) November 8, 2022
यशोदा सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली असता समांथाला तिच्या आजाराविषयी विचारलं गेलं त्यावर ती म्हणाली, ‘जस की मी माझ्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, काही दिवस चांगले जातात तर काही दिवस वाईट. एका क्षणाला मला वाटलं होतं की, एक पाऊल टाकणंही मुश्किल आहे पण मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मी खूप काही केलं आहे आणि इथपर्यंत पोहोचली आहे आणि पुढेही मी हे करू शकते, मी इथे लढण्यासाठीच आली आहे’.
समांथा पुढे म्हणाली, ‘मी माझ्या आजाराविषयी सांगितलं आणि त्यानंतर त्याविषयीच्या अनेक बातम्या पाहिल्या. त्यांच्या हेडलाइन्स वाचून मी खूप अस्वस्थ झाले. माझ्यासाठी हे खूप खतरनाक होत मी सांगू इच्छिते की मी अजून जिवंत आहे. माझा आजार हा जिवघेणा नाहीये’.