मुंबई, 05 जून- सलमान खानचा बहूचर्चित भारत सिनेमा आज प्रदर्शित झाला ईदच्या मुहूर्तावर सलमान त्याचे सिनेमे प्रदर्शित करतो हे साऱ्यांनाच माहीत आहे. या सिनेमाचे रिव्ह्यू चांगले येत असून सिनेव्यापार तज्ज्ञांच्या मते हा सिनेमा चांगला गल्ला कमवेल. मुंबईत सकाळपासून अनेक थिएटरसमोर हाऊसफुल्लचा बोर्ड लागलेला दिसत आहे. सिनेमा पाहून आलेला प्रत्येक प्रेक्षक सलमानच्या या सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहे. एका ट्विटर युझरने लिहिले की, सिनेमात सलमानची एण्ट्री भन्नाट दाखवण्यात आली आहे. मध्यांतरापर्यंत सिनेमाने पकड धरून ठेवली आहे. लोक चित्रपटगृहात स्क्रीनवर पैसे उडवत आहेत. अभिनेत्रीच्या दारुड्या नवऱ्यावर न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा
बॉलिवूड गायिका पलक मुच्छालनेही सिनेमाबद्दल ट्वीट केलं. सलमानच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींपैकी एक पलक आहे. तिने ट्वीटमध्ये म्हटलं की, या सिनेमाचा प्राण सलमान खान आहे. त्याची वृद्धापकाळातली व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने हवाई दलाच्या बेपत्ता विमानावरून मोदींची उडवली थट्टा
Just watched #Bharat!
— Palak Muchhal (@palakmuchhal3) June 4, 2019
A journey of a man and nation together, releases today!!! Go watch it to experience a ride of emotions, fun and laughter!@BeingSalmanKhan #KatrinaKaif @aliabbaszafar @DishPatani @WhoSunilGrover @Norafatehi @bindasbhidu @itsBhushanKumar @SKFilmsOfficial
Bharat Screening- कलाकारांच्या गर्दीत मलायका- अर्जुन कुठेच दिसले नाहीत सलमानची ईद- बॉलिवूडमध्ये ईद नेहमीच सलमानच्या नावावर राहिली आहे. त्याचे अनेक सुपरहिट सिनेमे ईदच्या दिवशीच प्रदर्शित करण्यात आले. भाईजानचे चाहते त्याचा प्रत्येक सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यालाच प्राधान्य देतात. यासाठी ते वाट्टेल त्यांची करायचीही तयारी असते. ट्यूबलाइट सिनेमा सोडला तर त्याच्या टायगर जिंदा है, वॉण्टेड सुलतान हे तीनही सिनेमे ईदला प्रदर्शित झाले होते. या तीनही सिनेमांनी १०० कोटींचा गल्ला कमावला होता. फक्त ट्यूबलाइट सिनेमाला ईदच्या दिवशी प्रदर्शित होऊनही चांगली कमाई करता आली नव्हती. या सिनेमात सलमान कतरिना कैफ आणि दिशा पाटनीसोबत दिसणार आहे. या दोघींशिवाय सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसेच एका सीनमध्ये तबूनेही काम केलं आहे.