‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने हवाई दलाच्या बेपत्ता विमानावरून मोदींची उडवली थट्टा

याआधी तिने आयएएफ विंग कमांडर अभिनंदनचीही सोशल मीडियावर थट्टा उडवली होती. अभिनंदनच्या मिश्यांची थट्टा तिने उडवली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 01:49 PM IST

‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने हवाई दलाच्या बेपत्ता विमानावरून मोदींची उडवली थट्टा

नवी दिल्ली, 05 जून- पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिकने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वीणाने भारतीय हवाई दलाचे एएन- ३२ विमान गायब झाल्यावर असंवेदनशील वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र  मोदींची थट्टा उडवली आहे. सोशल मीडियावर वीणाच्या या वक्तव्याची निंदा केली जात आहे.वीणाने लिहिले की, ‘आयएएफ एएन- ३२ बेपत्ता झालेलं नाहीये. हवामान खूप खराब आहे आणि रडारला याचा पत्ता लागत नाहीये मिलिट्री सायंटीस्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी.’ वीणाला तिच्या या ट्वीटवरून ट्रोल केलं जात आहे.

Bharat Public Review- अ‍ॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’

एका युझरने लिहिले की, ‘जिस थाली में खाना उसी थाली में छेद करना याचं उत्तम उदाहरण आहे.’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं की, ‘चीप पब्लिसिटी मिळवणं पाकिस्तानमधील लोकांना चांगल्या पद्धतीने येतं. त्यांना फक्त खोटं बोलता येतं. आता या लोकांना काम मिळत नसल्यामुळे अशी कामं करत आहेत. याच गोष्टींमुळे तू बॉलिवूडमधून गायब आहेस.’ काहींनी वीणाला धमकीही दिली.Bharat Screening- कलाकारांच्या गर्दीत मलायका- अर्जुन कुठेच दिसले नाहीत

एएन - 32 या विमानाने आसाममधल्या जोरहाटमधून अरुणाचल प्रदेशच्या दिशेने झेप घेतली पण हे विमान मध्येच बेपत्ता झालं. या विमानाचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे पण याबद्दलची कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. विमानात आठ क्रू मेंबर आणि पाच लोक होते. खराब हवामानामुळे शोध मोहिमेत अनेक अडचणी येत आहेत.

याआधी वीणा मलिकने आयएएफ विंग कमांडर अभिनंदनचीही सोशल मीडियावर थट्टा उडवली होती. अभिनंदनच्या मिश्यांची थट्टा तिने उडवली होती. वीणाने लिहिले की, ‘माझ्या बॉलिवूडमधील सर्व मित्रांना मी सांगू इच्छितेकी आमच्या वाकड्यात शिरू नका.’ दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने अभिनंदनचा फोटो शेअर करत म्हटलं की, ‘आता आता तर आला आहेस.. चांगला पाहूणचार होईल तुझा.’

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...