अभिनेत्रीच्या दारुड्या नवऱ्यावर न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

अभिनेत्रीच्या दारुड्या नवऱ्यावर न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

तिने न्यायालयाकडे सीसीटीव्ही फुटेजही दिले होते. यामुळे तिची बाजू एवढी मजबूत होती की न्यायाधीशांनी त्याची बाजू ऐकण्याचीही तसदी घेतली नाही.

  • Share this:

मुंबई, 05 जून- अदिती गोवित्रीकरची बहीण आरजू गोवित्रीकरने आपल्या नवऱ्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. आरजूने सिद्धार्थ सबरवालवर नशेच्या धुंदीत मारपीट केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आरजूला दिलासा मिळाला आहे. दादर महानगर न्यायालयाने सिद्धार्थला पुढील नोटीस मिळेपर्यंत त्याच्या वरळीच्या घरात जाण्यावर बंदी घातली आहे. आरजू आणि सिद्धार्थ वरळी येथील पोचखानावाला रोड येथे राहतात. मात्र सिद्धार्थच्या तापट स्वभावामुळे तिने घर सोडलं होतं. याशिवाय आरजूने न्यायालयाकडे सीसीटीव्ही फुटेजही दिले होते. यामुळे तिची बाजू एवढी मजबूत होती की न्यायाधीशांनी त्याची बाजू ऐकण्याचीही तसदी घेतली नाही.

Bharat Public Review- अ‍ॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’

आरजूने आपल्या तक्रारीसोबत १५ फेब्रुवारीचं सीसीटीव्ही फुटेजही सादर केलं होतं. यात सिद्धार्थ आरजूच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. यानंतर १९ फेब्रुवारीला आरजुने तक्रार नोंदवली होती. वरळी पोलीस ठाण्यात सिद्धार्थविरुद्ध आयपीसी धारा ४९८ अ (क्रूरता), ३२३ (नुकसान पोहोचवणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या इराद्याने अपमान करणे), ५०६ (धमकी देणं) आणि ५०९ (महिलेच्या विनयशीलतेचा अपमान) हे गुन्हे दाखल करण्यात आले.

Bharat Screening- कलाकारांच्या गर्दीत मलायका- अर्जुन कुठेच दिसले नाहीत

आपली बाजू मांडताना सिद्धार्थ म्हणाला की, आरजू फक्त कथा रचत आहे. तिने स्वतःहून सिद्धार्थला मारायला सांगितलं होतं. सिद्धार्थ खरं किती बोलतो हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं. पोलिसांनीही त्याचं हे म्हणणं फारसं ऐकून घेतलं नाही.

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या