बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफचा भारत सिनेमा आज प्रदर्शित झाला. मंगळवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. सिनेमा पाहण्यासाठी सुनील शेट्टी, अनिल कपूर, तब्बू, बॉबी देओल, सनी लिओनी, संजय लीला भन्साळी, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, सुनील ग्रोवर आणि क्रिती सेनन यांसारखे अनेक स्टार आले होते. या सगळ्यात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरची अनुपस्थिती अनेकांना खटकत होती.
मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनीही ते नात्यात असल्याचं मान्य केलं आहे. मलायकाने अरबाज खानशी अनेक वर्षांचं लग्न मोडत घटस्फोट घेतला होता. असं म्हटलं जातं की, मलायका आणि अर्जुनचं नातं तुटण्याला अर्जुन कपूर हे एक कारण होतं.
सलमानला दोघांचं हे नातं कधीच आवडलं नाही. यामुळे अर्जुन आणि त्याच्या नात्यात अंतर आलं. मात्र या गोष्टीवर कोणीही अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही.
अरबाज खान या स्क्रीनिंगला आला होता. मलायका आणि अर्जुन या स्क्रीनिंगला न येण्याचं मुख्य कारण सलमान असला तर इथे तीनही भावंडं एकत्र असल्यामुळे तिनं या कार्यक्रमाला न येणंच पसंत केलं.