Elec-widget

Bigg Boss मुळे होणार सलमान खानचं मोठं नुकसान, काय आहे यामागचं कारण?

Bigg Boss मुळे होणार सलमान खानचं मोठं नुकसान, काय आहे यामागचं कारण?

बिग बॉस सुरू होताच सर्वात मोठी समस्या सलमान खानला होणार आहे. या शोमुळे त्याला मोठं नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचा 13 वा सीझन सुरू झाला आहे. नुकताच या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला. शो सुरू होऊन अवघे काही तासच उलटले नाहीत तोपर्यंत टीआरपीच्या क्रमवारीत बिग बॉस अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्ह दिसत आहेत. हा शो टीव्हीवरील सर्वच कार्यक्रमांना टक्कर देणार यात शंका नाही. पण हा सुरू होताच सर्वात मोठी समस्या सलमान खानला होणार आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे बिग बॉसचं टायमिंग.

सलमान खानचा शो बिग बॉस 13 रोज रात्री 10.30 वाजता आठवड्यातून 5 दिवस प्रसारित केला जाणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी विकेंड वॉर असेल. हे दोनच दिवस असे असतात ज्यादिवशी सलमान खान घरातील सदस्यांची खबर घेतो आणि त्यांना समजावतो. मागच्या सर्व सीझनचा आलेख पाहता या दिवशी या शोचा टीआरपी सर्वाधिक राहिला आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल की चांगला टीआरपी असेल तर मग समस्या कशी काय असू शकते. तर याचं कारण आहे सलमाच्या प्रॉडक्शन हाउसचा दुसरा शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'

'अब तू किसी लड़की को हाथ तो लगा के दिखा...', Mardaani 2 चा दमदार Teaser रिलीज

Loading...

 

View this post on Instagram

 

Aaj aayegi maalkin @ameeshapatel9 lene contestants ki class, agar chahiye inhe #BiggBoss ka ration toh aana padega paas paas! Watch #BiggBoss13 tonight at 10:30 PM only on #ColorsTV. Anytime on @voot. @vivo_india @beingsalmankhan #BB13 #SalmanKhan

A post shared by Colors TV (@colorstv) on

द कपिल शर्मा शोमधून सलमाननं पहिल्यांदा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. सलमान या शोचा प्रोड्युसर आहे आणि त्यासाठी त्यानं बराच पैसा लावला आहे. 'द कपिल शर्मा शो' दर शनिवार रविवारी रात्री 9 वाजता प्रसारित केला जातो. सध्या हा शो टीआरपी लिस्टमध्ये टॉपला आहे. मात्र आठवड्याभरातच बिग बॉसशी या शोची टक्कर होऊ शकते. अशात जर बिग बॉसला टीआरपी जास्त मिळाला तर सलमानच्या प्रॉडक्शन हाउसचं नुकसान होईल आणि जर बिग बॉसचा टीआरपी घसरला तर सलमानच्या स्टारडमवर फरक पडेल. करण हा शो सलमानच होस्ट करत आहे.

Viju Khote Death : सरदाराचं 'नमक' खाण्यासाठी कालियाला मिळाले होते एवढे पैसे

सलमान खान हा बॉक्स ऑफिसचा सुलतान मानला जातो. यासोबतच सध्या तो टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपला जम बसवत आहे. पहिल्यांदाच त्यान कपिल शर्मा शोमध्ये पैसा लावला आणि सध्या टीआरपीमध्ये नंबर वन आहे. तर दुसरीकडे बिग बॉसची लोकप्रियता वेगळी सांगायला नको. अशात पहिल्यांदाच सलमान विरुद्ध सलमान अशी टक्कर आता टीव्हीवर पाहायला मिळत आहे. अर्थात येत्या काळात कोणता शो टीआरपीमध्ये बाजी मारतो हे चित्र स्पष्ट होईलच मात्र सलमान विरूद्ध सलमान ही रेस भाईजान कशी जिंकतो हे पाहाणं औत्सुक्याच असणार आहे.

Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची Bigg Boss च्या घरात घासणार भांडी?

==============================================================

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...