मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी लग्न केलं असतं तर...', Big Boss 14 च्या ग्रँड फिनालेत सलमान खाननं व्यक्त केली खंत

'मी लग्न केलं असतं तर...', Big Boss 14 च्या ग्रँड फिनालेत सलमान खाननं व्यक्त केली खंत

Big boss salman khan

Big boss salman khan

Big Boss 14 च्या ग्रँड फिनालेत सलमान खान (salman khan) आपल्या लग्नाबाबत व्यक्त झाला आहे.

मुंबई, 22 फेब्रुवारी: बिग बॉस सीझन 14 (Bigg Boss 14) चा ग्रँड फिनाले पार पडला. यामध्ये रुबिना दिलेकने (Rubina Dilaik) विजेतेपद पटकावलं असून राहुल वैद्य (Rahul Khanna) दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सोशल मीडियावर या विजेत्यांची चर्चा तर होतीच पण बिग बॉस सलमान खानबाबतही (Salman Khan) चर्चा रंगू लागल्या आणि या चर्चेचा विषय म्हणजे त्याचं लग्न.

सलमान खान (Salman Khan)आपल्या खास होस्टिंगच्या शैलीने नेहमीच या शोची रंगत वाढवत असतो. कालच्या अंतिम भागात देखील सलमान खाननं आपल्या खास खुमासदार शैलीने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. सलमान खान म्हणजे त्याच्या लग्नाचा विषय हा निघतोच आणि या शोच्या फिनालेमध्येदेखील हेच झालं. सलमान आपल्या लग्नाबाबत व्यक्त झाला आहे.

बिग बॉसच्या फिनालेमध्ये डान्स दिवाने या नवीन कार्यक्रमातील लहानग्याने हजेरी लावली होती. यावेळी सलमान खाननं त्याला त्याचं नाव विचारलं. यावर त्याने आपल्याला सलमान खान नाही तर सोहेल खान (Sohail Khan) आवडत असल्याचं म्हटलं. त्यावर सलमान खान याने आपल्या बुद्दीचातुर्याने त्याला जर मी वेळेवर लग्न केलं असतं तर तुझ्याइतके मला नातवंडं असती असं म्हटलं. यावर त्याच्या या उत्तराने सर्वच जण खळखळून हसू लागले. सलमानला त्याच्या लग्नाविषयी नेहमीच प्रश्न विचारले जातात. परंतु आता सलमान खान याने याची उत्तर देण्याची आयडिया शिकली आहे. त्यामुळं आता या प्रश्नावर तो उत्तर देत सर्वांना निरुत्तर करतो.

हे वाचा -  ‘बिग बॉस’ जिंकूनही रुबिना हरली; 36 पैकी 8 लाख रुपये द्यावे लागले परत; जाणून घ्या कारण...

बिग बॉस सीझन 14 (Bigg Boss 14) या शेवटच्या भागात रुबिनाने राहुल वैद्यला टक्कर देत विजेतेपद मिळवले.अंतिम 3 मध्ये रुबिना, राहुल आणि निक्की तांबोळी यांच्यात टक्कर पाहायला मिळाली होती. पण अखेर रुबिनाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. यामध्ये विजेता घोषित करताना सलमान खाननं दोन्ही स्पर्धकांबरोबरच चाहत्यांच्या आणि त्यांच्या घरातील व्यक्तींच्या मनातील धाकधूक देखील वाढवली होती. पण अखेर रुबिनाने बाजी मारली. या कार्यक्रमात राहुल वैद्य याची गर्लफ्रेंड दिशा परमारदेखील आली होती. या कार्यक्रमात चाहत्यांनी लवकर लग्न करा अशा घोषणा देत आपलं प्रेम व्यक्त केलं.

हे वाचा - 'ते सीन करताना मला...', Bold Scenes बाबत अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

दरम्यान, बिग बॉसच्या या पर्वानंतर सलमान खान लवकरच चाहत्यांना 'राधे- युअर मोस्ट वाँटेड भाई'(Radhe-your most wanted bhai) या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान याच्याबरोबर दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून रणदीप हुड्डा, झरीना वहाब आणि जॅकी श्रॉफ देखील दिसणार आहेत. याचबरोबर दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या पठाण या सिनेमात देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Reality show, Salman khan