बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी शोपैकी एक म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
2/ 10
भारतीय मनोरंजन सृष्टीतील अनेक नामांकित सेलिब्रिटी बिग बॉसच्या स्पर्धेत उतरताना दिसतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
3/ 10
यंदाचं या शोचं हे 14 वं पर्व होतं. अन् हे पर्व जिंकलं ते अभिनेत्री रुबिना दिलैक हिनं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10
तब्बल 100 दिवस घरातील इतर स्पर्धकांना टक्कर देऊन, मिळालेला प्रत्येक टास्क जिंकून तिनं बिग बॉस १४च्या विजेता पदावर आपलं नाव कोरलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
5/ 10
बिग बॉस जिंकणाऱ्या रुबिनाला तब्बल ३६ लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आलं. परंतु खरं पाहाता हे सर्व पैसे घेऊन तिला घरी जाता येणार नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
6/ 10
ज्या प्रमाणे एखादी लॉट्री जिंकल्यानंतर त्यावर विविध प्रकारचे टॅक्स द्यावे लागतात अगदी त्याच प्रमाणे रुबिनाला देखील बक्षिसाच्या एकूण रकमेपैकी काही पैसे कर म्हणून द्यावा लागला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
7/ 10
नव्या कर प्रणालीनुसार रुबिनाला आठ लाख 17 हजार 500 रुपये कर स्वरुपात सरकारकडे जमा करावे लागले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
8/ 10
या पार्श्वभूमीवर तिला 36 लाखांपैकी केवळ 27 लाख 82 हजार 500 रुपये मिळाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
9/ 10
खरं तर बिग बॉसच्या १४ व्या पर्वात विजेत्या स्पर्धकाला ५० लाख रुपयांचं बक्षिस मिळणार होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
10/ 10
परंतु राखी सावंतनं फायनलमध्ये पोहोचताच १४ लाख रुपये घेऊन शोमधून काढता पाय घेतला. परिणामी रुबिनाला केवळ ३६ लाखांवरच समाधान मानावं लागलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)