'या' अभिनेत्यावर होता बलात्काराचा आरोप, आता सलमान खानच्या शोमध्ये घेणार एण्ट्री Salman Khan | Bigg Boss | Karan Oberoi

Salman Khan | Bigg Boss | Karan Oberoi या प्रकरणात मी पाहिलं की, एका खोट्या प्रकरणात फक्त एकाच माणसाला नाही तर किती लोकांना त्रास होतो.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 08:06 PM IST

'या' अभिनेत्यावर होता बलात्काराचा आरोप, आता सलमान खानच्या शोमध्ये घेणार एण्ट्री Salman Khan | Bigg Boss | Karan Oberoi

मुंबई, 26 जून- काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपात अडकलेला टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय नुकताच एक महिन्याचा तुरुंगवास भोगून बाहेर आला. करणवर महिला ज्योतिषीने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. मात्र या प्रकरणी सेशन कोर्टाने अनेकवेळा करणचा जामीनही रद्द केला. अखेर करणच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्ज केला आणि न्यायालयाने या प्रकरणी करणला निर्दोष मुक्त करण्यात आले. तसेच मुंबई पोलिसांना या प्रकरणी योग्य शोध घेण्यास सांगितलं आहे.

या निर्णयानंतर करण ओबेरॉय #MenToo चळवळीचा चेहरा झाला आहे. न्यूज१८ हिंदीशी बोलताना करण म्हणाला होता की, त्याने एक महिन्यात तुरुंगात सूर्यप्रकाश पाहिला नाही. तो काळ त्याच्यासाठी फार कठीण होता. पण या प्रकरणात मी पाहिलं की, एका खोट्या प्रकरणात फक्त एकाच माणसाला नाही तर किती लोकांना त्रास होतो. करणला जेव्हा बिग बॉसमधील एण्ट्रीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, सलमान खानच्या बिग बॉस १३ मध्ये जाऊ शकतो.

याला म्हणतात दम! रजनीकांतचा फोटो हटवल्यामुळे BIGG BOSS अडचणीत

VIDEO: रितेश देशमुखने सांगितलं त्याच्या सुखी संसाराचं रहस्य

करण पुढे म्हणाला की, ‘फक्त बिग बॉसच नाही. अनेक शोसाठी मला विचारण्यात आलं. जेव्हापासून मी बाहेर आलो मला अनेक शोबद्दल विचारण्यात आले. कोणत्याही शोमध्ये आता जाईन तेव्हा #MenToo साठीच मी काम करेन. #MenToo साठी न्यायालयीन बदल आणण्यासाठी आता मी काम करणार आहे. यासाठी कोणत्याही शोमध्ये जावं लागलं तरी मी जाईन.’

Loading...

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2019 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...