मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...

VIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...

आयफा अवॉर्ड (IIFA Awards 2019) मधील सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आयफा अवॉर्ड (IIFA Awards 2019) मधील सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आयफा अवॉर्ड (IIFA Awards 2019) मधील सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई, 21 सप्टेंबर : आयफा अवॉर्ड (IIFA Awards 2019) कलाकरांच्या स्टायलिश अंदाज आणि लुक्ससाठी चर्चेत राहिला. ग्रीन कार्पेटवर आपण इतरांपेक्षा सुंदर आणि वेगळ दिसावं असा या अवॉर्ड फंक्शनला पोहोचणाऱ्या प्रत्येकचा प्रयत्न असतो. दरवर्षी भारताबाहेर होणारा हा अवॉर्ड सोहळा यंदा मुंबईमध्येच पार पडला. आयफानं यंदा 20 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यातील सलमान खानचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान ऑडियन्समध्ये बसलेला दिसत आहे. स्टेजवर कतरिनाच्या परफॉर्मन्सची घोषणा केली जाते आणि हे ऐकताच सलमान अचानक उठून उभा राहतो आणि जोरात टाळ्या वाजवू लागतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर सलमान अद्याप कतरिनावर फिदा आहे असंच दिसून येत. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर युजर्सच्या खूप मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

रामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते...

 
View this post on Instagram
 

#SalmanKhan big cheer for #katrinakaif at #iifa2019 🔥

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

एका युजरनं लिहिलं, हे दोघं लग्न का नाही करत आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, एकदा जी राणी झाली ती शेवटपर्यंत राणीच राहते. सलमान तिच्या हार्ड वर्कचा आदर करतो आणि ही त्याची व्यक्त होण्याची पद्धत आहे. सलमान आणि कतरिना यांनी नुकतच भारत सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट राहिला.

लीक झाला Bigg Boss 13 चा प्रोमो, व्हिडीओमधून समोर आली स्पर्धकांची नावं

 
View this post on Instagram
 

Happy birthday Katrinaaa... @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान आणि कतरिना ही अशी जोडी आहे. ज्यांनी अद्याप एकही फ्लॉप सिनेमा दिलेला नाही. दोघांनीही अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. खरं तर भारतमध्ये सलमानसोबत प्रियांका चोप्रा काम करणार होती मात्र नंतर तिनं यातून बॅकआउट केलं आणि हा सिनेमा कतरिनाच्या पदरात पडला.

पैशाअभावी झाला रुमा देवींच्या मुलाचा मृत्यू, असं बदललं 22 हजार महिलांचं आयुष्य

==========================================================

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

First published:
top videos

    Tags: Bollywood, Salman khan