मुंबई, 21 सप्टेंबर : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गलीबॉय' चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री झाली आहे. भारताकडून या चित्रपटाची अधिकृतरित्या निवड करण्यात आलीय. या चित्रपटाचं दिग्दर्सन झोया अख्तर यांनी केलं आहे.गली बॉय सिनेमातून झोयाने स्ट्रीट रॅपरचा संघर्ष दाखवला आहे. मुंबईतल्या धारावी 17 मध्ये राहणाऱ्या मुरादच्या (रणवीर सिंग) संघर्षाची ही गोष्ट आहे.
मुरादला आपल्या गरिबीवर मात करायची असते. त्यासाठी काय करावं याबद्दल त्याला फारसं काही माहीत नसतं. स्वतःचं अस्तित्व शोधताना त्याला रॅपची फार मदत होते. अनेकदा तो आपल्या मनातील दुःख लेखणीच्या माध्यमातून वहीत लिहायचा. सफीना (आलिया भट्ट) त्याची लहानपणापासूनची गर्लफ्रेंड असते. ती एका श्रीमंत घरातली मुलगी असते. तिचे वडील डॉक्टर असतात तर तीही सर्जन व्हायचं शिक्षण घेत असते. मुराद आणि सफीनाच्या राहणीमानात कमालीचं अंतर असतं. दरम्यान मुरादचे वडील (विजय राज) दुसरं लग्न करतात. वडिलांनी केलेलं हे कृत्य मुरादला मान्य नव्हतं. आईची होणारी फडफड तो पाहत होता. पण वडिलांसमोर बोलायची त्याची फारशी हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृत्याला तो मुकपणे होकार देत असतो.
मन मारून जगत असताना अचानक मुरादच्या कॉलेजमध्ये रॅपर एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) येतो. या दिवसापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळायला लागते. आपणही एमसी शेर व्हावं अशी इच्छा मुरादची असते. शेरकडूनच तो रॅपचं प्रशिक्षण घेतो. मात्र पुन्हा एकदा नशीब त्याला जमिनीवर आणतं. काही कारणांमुळे मुरादला वडिलांची ड्रायव्हरची नोकरी करावी लागते.
दरम्यान त्याची ओळख म्युझिक प्रोग्रामर स्कायशी (कल्की कोचलीन) होते. स्काय, मुराद आणि एमसी शेर एकत्र येऊन एक गाणं रेकॉर्ड करतात. इथून मुरादच्या गली बॉय प्रवासाला सुरुवात होते. मात्र नोकरी की रॅप यापैकी काय निवडायचं याच्या द्विधा मनःस्थितीत तो असतो. या सगळ्यात मुराद त्याचं रॅपर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण करतो याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे.
=======================================================
VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Gully boy movie