मुंबई, 15 एप्रिल : हरियाणाची लोकप्रिय गायिका आणि डान्सर सपना चौधरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर येताच हिट होतात. मागच्या काही दिवसांपासून सपनाचे काही जुने व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण लॉकडाऊनमध्ये सपनाचं एक नवं गाण सुद्धा रिलीज झालं आहे. सपनाच्या या गाण्याबद्दल तिच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता होती. त्यामुळे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी तिचं हे गाणं लॉकडाऊन दरम्यान रिलीज करण्यात आलं. या गाण्याचे बोल आहेत गजबन छोरी. हे गाणं रिलीज झाल्यानंतर आता युट्यूबवर ट्रेंडमध्ये आहे.
सपना चौधरीचं हे नवं व्हिडीओ साँग गजबन छोरी P&M मूव्हीजच्या लेबलवर लॉन्च करण्यात आलं आहे. हे गाणं एमडी देसी रॉक आणि सपना चौधरीनं गायलं आहे. या व्हिडीओ साँगचा निर्माता पवन चावला आहे तर या गाण्याला संगीत लक्ष्यने दिलं आहे.
दारू प्यायल्यानं कोरोना मरतो का? कार्तिकच्या प्रश्नावर काय म्हणाल्या डॉक्टर
या गाण्याचे बोल आहेत, 'रे दिल पर लिख दिया नाम गजबन छोरी ने, मेरी बहू बना दे राम रे गजबन छोरी ने' गाण्याच्या ओळीप्रमाणे या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. या गाण्यात सपना चौधरी मॉर्डन लुकमध्ये दिसत आहे. तिचा या गाण्यात पहिल्यांदाच बोल्ड लुक पाहायला मिळत आहे.
'आग लावण्याचं राजकारण खेळला नाहीस', अभिनेत्याची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
सपना चौधरीनं करिअरची सुरुवात हरियाणाच्या एका ऑर्केस्ट्रा टीमसोबत केली होती. रागिनी नावाच्या एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमधून ती पार्ट्यांमध्ये गाणी गात असे. त्यानंतर तिनं स्टेज डान्सला सुरुवात केली. त्यानंतर तिनं बिग बॉस 11मध्ये संधी मिळाली. मात्र यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.
ना स्टारडम, ना स्टाइल, पहिल्या फोटोशूटच्या वेळी असे दिसायचे अमिताभ बच्चन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood