मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आग लावण्याचं राजकारण खेळला नाहीस', मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने

'आग लावण्याचं राजकारण खेळला नाहीस', मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने

या अभिनेत्यानं पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

या अभिनेत्यानं पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

या अभिनेत्यानं पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

मुंबई, 15 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सुरुवातीला कमी असेला या व्हायरसग्रस्तांचा आकाडा मागच्या काही दिवसात मात्र प्रचंड वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहारतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र संयमानं सर्व परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. पण विरोधी पक्षातील मंडळी मात्र त्यांच्यावर सतत टीका करताना दिसत आहे.

दरम्यान काल म्हणजे 14 एप्रिलला काही लोकांनी गावी जायचे आहे असं म्हणत वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. याप्रकरणी विनय दुबे याला अटकही करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. याच संदर्भात मराठी अभिनेते किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

लॉकडाऊनमध्ये वांद्र्यातील गर्दीमागे मोठं षड्यंत्र? वाचा नेमकं काय झालं

किरण माने यांची फेसबुक पोस्ट

उद्धवा...

सतत सांगतोस,'मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय' तरीही काही नतद्रष्टांनी, तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय. खरंतर तू म्हणालास तसं,'राजकारण खेळायला आयुष्य पडलंय'पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमातहे ऐकणार नाही !तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे! तू आमच्या हतबलतेचा फायदा घेऊन कृतज्ञतेच्या नांवाखाली रस्त्यावर आणून भरकटवलं नाहीस ! ...या अत्यंत भयावह परीस्थितीमध्ये आमच्या मनातल्या भितीला 'हेरून' आम्हाला पोकळ एकतेचं गाजर दाखवून कमेकांत 'आग' लावण्याचं राजकारण खेळला नाहीस !! महाभयंकर विषाणूनं जगभर थैमान घातलेलं असताना.. प्रत्येकानं घरात शांत बसून, सोशल डिस्टन्स ठेवून, आपला जीव वाचवण्याची गरज असताना... हिंस्त्र गिधाडासारखं "रस्त्यावर या..गच्चीत या.." असं क्रूर आवाहन-आव्हान काहीच केलं नाहीस. "तुम्ही खबरदारी घ्या... मी जबाबदारी घेतो !" हे वाक्य तू 'आतून' - मनाच्या तळातून - उद्गारलंस... आणि आमच्या डोळ्यांत पाणी तरळलं.. तू फक्त दिलासा दे.. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत ! तू तुझी जबाबदारी पार पाड. आम्ही खबरदारीसाठी वचनबद्ध आहोत !! उद्धवा... माझ्या राजा... बाळासाहेबांच्या बछड्या..तू लढ...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!!

- किरण माने.

वांद्रे गर्दी प्रकरणावरुन शरद पवारांनी टोचले भाजपचे कान, म्हणाले...

किरण माने यांनी याआधीही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागितली होती. सॉरी उद्धवजी... अशी सुरुवात असलेली ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल सुद्धा झाली होती. विशेष म्हणजे या पोस्ट अगोदर किरण माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मात्र कोरोनाबाबतची सर्व परिस्थिती ते ज्या प्रकारे हाताळत आहेत हे पाहिल्यावर किरण माने यांनी फेसबुकवरुन माफी मागितली होती.

(संपादन : मेघा जेठे.)

मुंबईत परप्रांतीयांची गर्दी जमवणाऱ्या विनय दुबेला अटक

First published:
top videos

    Tags: Corona