मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Salman Khan: धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला 'जेव्हा जे व्हायचंय ते होईलच...'

Salman Khan: धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला 'जेव्हा जे व्हायचंय ते होईलच...'

 सलमान खान

सलमान खान

सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. पण आता पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : अभिनेता सलमान खानचा जीव सध्या धोक्यात आहे. त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अलीकडेच सलमान खानच्या टीमला धमकीचा ईमेल आला होता, त्यानंतर त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर अनेक पोलीस कर्मचारी तैनात होते. सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. पण आता पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सलमानला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मेलने अभिनेत्याच्या कुटुंबाची झोप उडवली आहे. सगळेच सलमानसाठी खूप चिंतेत आहे. अभिनेत्याचे चाहते देखील सध्या काळजीत आहेत. पण असं असताना सलमानच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, अभिनेत्याला इतक्या कडक सुरक्षेवर आक्षेप आहे. सलमानचे कुटुंब, मित्र आणि चाहते या अभिनेत्यासाठी घाबरलेले आणि तणावात असताना, सलमान मात्र या धमक्यांना घाबरत नाही.

एकेकाळी गाजलेल्या नायिका आज बिनकामी काढतायत दिवस; टीव्हीच्या 'या' अभिनेत्रींची अशी झालीये अवस्था

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की सलमान एकतर ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे किंवा त्याचे कुटुंबात अजून तणाव निर्माण होऊ नये म्हणून तो सगळं काही ठीक असल्याचे भासवत आहे. कौटुंबिक दबावामुळे सलमानने बाहेरचे सर्व प्लॅन्स रद्द केले आहेत. शूटिंग आणि प्रमोशनही थांबले आहेत. पण सलमानचा या सुरक्षा व्यवस्थेवर आक्षेप आहे.

मित्राने सांगितले की, 'सलमानला असे वाटते की या धमकीकडे जितके लक्ष दिले जात आहे तितकेच आपण धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे अधिक लक्ष देत आहोत असे वाटते. यामुळे गुंडगिरीला असे वाटेल की तो त्याच्या योजनेत यशस्वी झाला आहे. पण सलमान खूप बेधडक आहे आणि तो घाबरत नाही. जेव्हा ते व्हायला हवे तेव्हा ते होईल, असे त्याचे म्हणणे आहे.'

याआधीही सलमानला दोन-तीनदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं कळतं. 2019 मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती. काही महिन्यांपूर्वी सलमानला धमकीचे पत्र पाठवण्यात आल्याचेही समोर आले होते, जे त्याचे वडील सलीम खान यांना मिळाले होते. त्यात लिहीले होते की, सिद्धू मूसवाला सारखेच नशीब तुमचे आणि सलीम खानला भेटणार आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले असून या प्रकरणात तो सध्या भटिंडा तुरुंगात आहे.

अलीकडेच बिश्नोई यांनी एक मुलाखत दिली होती, ज्यात त्याने सलमानला काळवीट मारल्याबद्दल माफी मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असे सांगितले होते. 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान यांच्यावर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असल्याची माहिती आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan