मुंबई, 20 मार्च : सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईनं सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बॉलिवूड जगतात खळबळ निर्माण झाली होती. त्यामुळं सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. दरम्यान काल लॉरेन्स बिष्णोई गॅंगनं सलमान खानला मेल केल्याचे समोर आलं होतं. सलमानच्या टीमनं बांद्रा पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली होती. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणार्या मेलने अभिनेत्याच्या कुटुंबाची तसेच मुंबई पोलिसांची झोप उडवली आहे. त्यानंतर आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी माहिती देताना सूत्राने सांगितले की, 'सलमान खानच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि त्याच्या टीम मध्ये सध्या खूप गंभीर वातावरण आहे आणि त्याच्या सुरक्षेबाबत खूप सगळ्यानांच काळजी आहे. अभिनेत्याला ठार मारण्याच्या नवीन धमक्यांमुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी सगळेच चिंतेत आहे. पण मुंबई पोलीस त्वरित कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे.'
काय सांगता! कंगनाने बनवून घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन; कधीकाळी सेटवर झाडांच्या मागे बदलायची कपडे
सुत्राने असेही सांगितले की, पोलिसांनी सलमान खानला त्याच्या सुरक्षेचा विचार करून त्याचे वेळापत्रक बदलण्याचा सल्ला दिला आहे. तो पुढे म्हणाला, “त्याच्या टीमला पुढील काही दिवस कोणत्याही कार्यक्रमांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे आणि त्यासंदर्भात काही प्रमोशनल उपक्रम होणार आहेत. पण ते टाळण्याच्याच सल्ला सध्या त्याला देण्यात आला आहे.' सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' पुढील महिन्यात एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. प्रमोशन सहसा चित्रपटाच्या रिलीजच्या सुमारे एक महिना आधी सुरू होते, ज्या दरम्यान अधिक सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते. पण सलमान सध्या मुंबईत नाही आणि तो केव्हा परत येईल याबद्दल काहीच माहिती नाही.
गायक सिद्धू मुसेवालानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आल्याने सर्वानांच धक्का बसला होता. काही दिवासापूर्वी लॉरेन्स बिष्णोईने 'एबीपी माझा' ला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले होते. या मुलाखतीत लॉरेन्स बिष्णोईने सांगितलं होतं की, 'आमच्या संपूर्ण समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. तो नेहमी आमच्या समाजाला कमी लेखतो. माझ्या समाजात प्राणी आणि झाडांचा जीव घेण्यास सक्त मनाई आहे. त्यांना आम्ही कधीही ईजा पोहोचवत नाही. मात्र सलमान खानने आमच्या इथे येत काळवीटाची शिकार केली होती. सलमान खानवर केस सुरु असूनही त्याने अजून आमच्या समाजाची माफी मागितलेली नसल्याचे तो या मुलाखतीत म्हणाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Salman khan