आगामी एपिसोडच्या प्रीकॅप व्हिडीओमध्ये सलमान खान आसिम रियाज, सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यावर भडकलेला दिसत आहे. आसिमनं काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ शुक्लाच्या स्वर्गीय वडीलांवर कमेंट केली होती. त्यामुळे सलमान आसिमवर भडकला आहे. आता आसिम रियाज खूपच इरिटेटिंग वाटत असंही सलमाननं यावेळी त्याला सांगितलं. याशिवाय सिद्धार्थचा रागीट स्वभाव आणि घरातील सदस्यांना शिव्या देणं या गोष्टींसाठी त्यानं सिद्धार्थालाही सुनावलं. OMG! छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै, किंमत ऐकून बसेल धक्का या व्हिडीओमध्ये सलमान आसिम आणि सिद्धार्थ व्यतिरिक्त रश्मी देसाईवरही भडकताना दिसणार आहे. रश्मीला सलमान सांगतो, तू नेहमीच कॅमेरामनला टोमणे मारत असतेस. तुला वाटतं की तुझी इमेज खराब करणारं फुटेज दाखवलं जात आहे. तर मग तू घरातून बाहेर जाऊ शकतेस. त्यानंतर सलमान बिग बॉसला घराचा दरवाजा उघडायला सांगताना दिसत आहे.
सलमान खान या आठवड्यात खूपच रागात असलेला दिसत आहे. अशा प्रकारे रागावल्यावर सलमाननं हा शो सोडण्याचा विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे यावेळी नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय या आठवड्यात काजोल आणि अजय देवगण सुद्धा या शोमध्ये हजेरी लावणार आहे. कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं त्या रात्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Salman khan