Home /News /entertainment /

कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं 'त्या' रात्री

कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं 'त्या' रात्री

कुशलच्या वडीलांनी आत्महत्या करण्याच्या आधीच्या रात्री नेमकं काय घडल होतं याविषयी मोठा खुलासा केला आहे.

  मुंबई, 03 जानेवरी : टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबीनं 27 डिसेंबरला आत्महत्या केली होती. त्याच्या अशाप्रकारे अचानक जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या निधनानंतर अनेक टीव्ही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही काही खुलासे केले. मात्र त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. पण आता कुशलच्या वडीलांनी कुशलनं आत्महत्या करण्याच्या आधीच्या रात्री नेमकं काय घडल होतं याविषयी मोठा खुलासा केला आहे. स्पॉटबॉय-ईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आत्महत्या करण्याच्या आधीच्या रात्री कुशल पूर्णपणे ठिक होता असं त्याच्या वडीलांनी सांगितलं. त्यानं वडीलांसोबत डिनंर केलं होतं आणि त्यावेळी त्याच्या बऱ्याच गप्पा सुद्धा झाल्या. त्याचे वडील सांगतात, ‘आमच्यात काही खास गप्पा नाही झाल्या. एक वडील-मुलात जे बोलणं होतं तसंच रोजच्या विषयांवर आम्ही बोललो. त्याआधी काही दिवसांपूर्वी कुशल सर्किट रेस दरम्यान जखमी झाला होता आमि येत्या काही दिवसातच त्याच्या खांद्याची सर्जरी होणार होती. त्यामुळे त्याला खांद्याची हालचाल करण्यास मनाई करण्यात आली होती.’ कॉन्सर्ट सुरू असतानाच नाचता नाचता फाटली रणवीरची पँट; दीपिकाने काय केलं पाहा
   
  View this post on Instagram
   

  ❤️

  A post shared by Kushal Punjabi. (@itsme_kushalpunjabi) on

  कुशल पंजाबीनं 27 डिसेंबर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याची सुसाइड नोट मिळाली. ज्यात त्यानं माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं म्हटलं होतं तसेच त्याच्या एकूण संपत्ती पैकी 50 टक्के संपत्ती आई-वडीलांच्या नावे तर 50 टक्के संपत्ती 3 वर्षीय मुलगा कियानच्या नावे केल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याच्या जवळच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार कुशल आणि त्याच्या पत्नीमध्ये मागच्या काही काळापासून वाद सुरू होते आणि त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. त्यामुळे ती मुलाला घेऊन शंघाईमध्ये राहत होती. 14 ऑगस्टलाच पाकिस्तानला धूर चारताना दिसणार मराठमोळा एअर फोर्स अधिकारी अजय देवगण
  आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदर कुशल सर्व काही ठिक करण्याच्या हेतूनं पत्नीची समजूत काढण्यासाठी शंघाईला गेला होता मात्र त्याच्या पत्नीनं घरी परतण्यास नकार दिला होता. त्यानंतर कुशल अधिकच डिप्रेशनमध्ये गेला होता. कुशलनंच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यानं Audrey Dolhen हिच्याशी 2015 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. 'लव मॅरेज', 'सीआयडी', 'जिंदगी विन्स' या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं. VIDEO बायको सांगत होती काम, नवरा होता फोनमध्ये बिझी नंतर काय झालं तुम्हीच पाहा
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या