मुंबई, 04 जानेवारी : दीपिका पदुकोणचा आगामी सिनेमा छपाकचं टायटल साँग नुकतंच मुंबईमध्ये रिलीज झालं. यावेळी एका पत्रकारानं दीपिकाला असा काही प्रश्न विचारला की तिनं स्टेजवरुनच ओरडून त्याला थांबवलं. दीपिका या सिनेमात लीड रोलमध्ये आहे. पण यासोबतच ती या सिनेमाची प्रोड्युसरही आहे. पण टायटल साँगच्या लॉन्चवेळी जेव्हा दीपिकाला जेव्हा विचारलं की या सिनेमात रणवीर सिंहचे पैसे गुंतले आहेत का? यावर दीपिका भडली. इतकंच नाही तर तिनं या पत्रकाराला त्याचा प्रश्न दुरुस्त करण्याचा सल्लाही दिला.
मुंबईमध्ये पार पडलेल्या या इव्हेंटमध्ये एक पत्रकार दीपिकाला घुमवून-फिरवून प्रश्न विचारत होता. त्यावर दीपिका त्याला म्हणली की, तुम्ही एवढं घुमवून-फिरवून का विचारताय सरळ-सरळ विचारा ना… त्यानंतर त्यावर त्या पत्रकारानं सुरुवतीला विक्रांत मेस्सीचं कौतुक करत म्हटलं, विक्रांत जी तुम्ही दीपिकासोबत कमाल काम केलं आहे. दीपिका तर सिनेमाची प्रोड्युसर सुद्धा आहे... त्यामुळे रणवीर सिंह सुद्धा या सिनेमाचा प्रोड्युसर बनतो कारण घरचा पैसा आहे... त्यावर दीपिका चिडली आणि स्टेजवरुनच ओरडली, हे तुम्हाला कोणी सांगितलं, हे माझे स्वतःचे पैसे आहेत आणि स्वतःची मेहनत आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच!
‘छपाक’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. नुकतंच या सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालं. यावेळी दीपिकासोबत रिअल हिरो लक्ष्मी अग्रवालनंही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘छपाक’चं टायटल साँग कोई चेहरा... च्या रिलीजवेळी गायक शंकर महादेवन यांनी हे गाणं लाइव्ह गायलं. यावेळी स्टेजवर उभ्या असलेली लक्ष्मी अग्रवाल भावुक झालेली दिसली. हे गाणं ऐकल्यावर लक्ष्मीला तिचे अश्रू आवरता आले नाहीत आणि ती रडू लागली. पण दीपिकानं लगेचच तिला मिठी मारत आधार दिला. स्टेजवरील हा प्रसंग सर्वांनाच भावुक करणारा होता.
मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेवर अनुराधा पौडवाल यांची पहिली प्रतिक्रिया
‘छपाक’ सिनेमा त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. शूटिंग दरम्यान या सिनेमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते तसेच दीपिका सुद्धा अनेकदा दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अजय देवगणचा ‘तानाजी’ सिनेमा सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.
VIDEO : ‘छपाक’च्या टायटल साँग रिलीज वेळी लक्ष्मी अग्रवालला अश्रू अनावर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.