मुंबई, 1 मार्च- शाहरुख खान च्या ‘पठाण’नंतर आता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट ‘टायगर 3’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल सलमानचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता या चित्रपटाचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याआधी पठाणचादेखील असाच एक व्हिडीओ लीक झाला होता. जो प्रचंड चर्चेत आला होता. सलमान खानच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा लीक झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित ‘टायगर 3’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. एक म्हणजे कतरिना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान खानसोबत पडद्यावर दिसणार आहे. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्याने चाहत्यांचं संपूर्ण लक्ष या चित्रपटाकडे वेधलं जात आहे. कतरिना आणि सलमानला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. (हे वाचा: Kl Rahul-Suniel Shetty: केएल-राहुल आणि सुनील शेट्टीची पहिली भेट कशी झाली? अभिनेत्याने स्वतः सांगितला जावयासोबतचा ‘तो’ किस्सा ) सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर 3’ मध्ये यंदा इमरान हाश्मीदेखील आपला जलवा दाखवताना दिसणार आहे. सेटवरून लीक झालेला हा व्हिडिओ एका खोलीतील असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये आजूबाजूला धूर दिसत आहे. व्हिडिओमध्ये इमरान हाश्मीही दिसत आहे. एखाद्या धमाकेदार सीनची तयारी सुरु असल्याचं लक्षात येत आहे. काही सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. यावर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
Emraan Hashmi from #Tiger3 🔥🔥Mahn look at his physique!!
— ` (@Salman_Rules) February 24, 2023
Battle between him & Salman Khan will be treat to watch!! pic.twitter.com/Qk5NeTI0vE
समोर आलेला हा व्हिडिओ सलमानच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल. या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘टायगर 3’ हा ‘एक था टायगर’ चित्रपटाचा तिसरा भाग असणार आहे. ज्यामध्ये सलमान आणि कतरिना एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय सलमान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे.या चित्रपटात सलमान पहिल्यांदाच पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.
कबीर सिंग दिग्दर्शित ‘टायगर 3’ चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग म्हणजेच ‘एक था टायगर’ 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच चित्रपटाचा सिक्वेन्स बनवण्यात आला,त्यालाही लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचा तिसरा भाग काय कमाल करतो पाहणं महत्वाचं ठरणार आहे.