मुंबई,28 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुलचे सासरे बनले आहेत. अथिया शेट्टी आणि केएल राहुल या नवीन वर्षी म्हणजेच 23 जानेवारीला खंडाळ्यात विवाहबद्ध झाले होते. सुनील प्रचंड आनंदी आहे कारण मंगळूरचा एक मुलगा आपला जावाई बनला आहे. सुनीलला हे नेहमीच हवं होतं. परंतु सुनील शेट्टी आणि केएल राहुलची पहिली भेट फारच मजेशीर आहे. स्वतः अभिनेत्याने याबाबत खुलासा केला आहे.
अलीकडेच सुनील शेट्टी यांनी सांगितलं की, 2019 मध्ये जेव्हा केएल राहुल पहिल्यांदा विमानतळावर आपल्याला भेटला तेव्हा त्यांची भेट कशी होती. सुनील शेट्टीने नुकतंच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती.या शोमध्ये कपिलशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ते दोघेही मंगळुरूचे आहेत याचा आपल्याला खूप आनंद आहे. त्यांची गावे एकमेकांच्या अगदी जवळ असल्याचंही सुनीलने सांगितलं.
सुनील शेट्टीने सांगितलं की, केएल राहुलसोबत त्यांची पहिली भेट विमानतळावर झाली होती. तो माझ्या गावचा म्हणजेच मंगळूरचा आहे हे जाणून मला खूप आनंद झाला होता. मी सुरुवातीपासूनच त्याचा चाहता होतो. आणि तो खूप चांगली कामगिरी करत होता हे जाणून मला खूप आनंद झाला होता. घरी आल्यावर मी पत्नी माना आणि अथियाला याबद्दल सांगितलं, परंतु त्यांनी फार काही न बोलता एकमेकांकडे पाहत राहिल्या. नंतर मानाने मला सांगितलं की, अथिया आणि राहुल काही दिवसांपासून एकमेकांशी बोलत आहेत.
याबाबत बोलताना सुनील शेट्टी पुढे म्हणाले की, अथिया आणि केएल राहुल एकमेकांना ओळखतात हे जाणून मला आश्चर्य वाटलं. कारण अथियाने आपल्याला याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. आपल्या मुलीला एक दक्षिण भारतीय मुलगा आवडला हे समजल्यावर आपल्याला प्रचंड आनंद झाल्याचं सुनीलने सांगितलं. त्यांनंतर हे नातं प्रेमात आणि आता लग्नात बदललं आहे.
अथिया आणि केएल राहुलबाबत सांगायचं झालं तर, या दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. लग्नानंतरसुद्धा हे जोडपं प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच अथिया आणि राहुलने उज्जैनमध्ये जाऊन महाकालेश्वर मंदिरात आशीर्वाद घेतला. अथिया चित्रपटापासून दूर असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kl rahul, Sunil shetty