मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: सिक्युरिटी गार्डनं बाजूला ढकललं तर भाईजानने केलं इग्नोर; भर कार्यक्रमात विकी कौशलला मिळाली अशी वागणूक

VIDEO: सिक्युरिटी गार्डनं बाजूला ढकललं तर भाईजानने केलं इग्नोर; भर कार्यक्रमात विकी कौशलला मिळाली अशी वागणूक

सलमान खान- विकी कौशलचा एक व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर तुफान  होत आहे.

सलमान खान- विकी कौशलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान होत आहे.

एका कार्यक्रमात सगळ्या मीडियासमोर भाईजानने विकीला दिलेल्या वागणुकीची चर्चा होत आहे. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान होत आहे.

  मुंबई, 25 मे :  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानने आजवर अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण या सगळ्यांमध्ये त्याच्या कतरिना कैफ सोबत असलेल्या नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली असली तरी भाईजान मात्र अजून एकट्यानेच आयुष्य जगत आहे. त्याचे आणि विकी कौशलचं नातं देखील त्यामुळे फार किचकट झालं आहे. आता एका कार्यक्रमात सगळ्या मीडियासमोर भाईजानने विकीला  दिलेल्या वागणुकीची चर्चा होत आहे. दोघांचा एक व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर तुफान  होत आहे.

नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता चाहत्यांना सलमान खानच्या टायगर 3 ची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या क्लिपमध्ये सलमान खानने विक्कीसोबत असे कृत्य केले की सगळेच थक्क झाले.

सलमान खान सध्या आयफा २०२३ साठी अबुधाबीमध्ये आहे. लवकरच अबूधाबीमध्ये आयफा हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.  आयफा 2023 या पुरस्कार सोहळ्याला अनेक स्टार्स उपस्थित राहणार आहेत. सलमान खानसोबत या कार्यक्रमात अभिषेक बच्चन, विकी कौशल, फराह खान आणि राजकुमार राव हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. दरम्यान, सलमान खान आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात सलमानने विक्कीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. एवढेच नाही तर या व्हिडीओमध्ये सलमान खानचा सिक्युरिटी गार्ड हा विकी कौशलला ढकलताना दिसत आहे. विकीचे चाहते या क्लिपवर जोरदार कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.

मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्याआधी दिलीप जोशी करायचे 'हे' काम; पत्नीच्या एका निर्णयानं बदललं जेठालालचं नशीब

विकी आणि  सलमान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'विकी हा सलमानला शेक हँड करत होता पण भाईनं इग्नोर केलं' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,  'हा जर विकी कौशल आहे का? जर असेल तर त्याला का बाजूला केले? दोघेही एकमेकांना भेटू शकले असते.' अशा कमेंट करत विकीचे चाहते भाईजानबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाईजानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सलमानसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात इमरान खलनायकाची भूमिका साकारणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पठाण स्टार शाहरुख खान देखील सलमान खानच्या चित्रपटात कॅमिओ करणार आहे.

First published:
top videos

    Tags: Salman khan, Vicky kaushal