त्यानंतर दिलीप जोशी यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. पर्श रावल यांच्यासोबत त्यांनी अनेक रंगभूमीवर काम केले. त्यांनी 'मैने प्यार किया', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'वन 2 का 4' यासह अनेक चित्रपटांमध्ये साईड रोल केले. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' करायला सुरुवात केल्यापासून त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले नाही.