Home /News /entertainment /

लाइव्ह चॅटवेळी सलमानच्या वागण्यामुळं लाजून गुलाबी झाली गर्लफ्रेंड युलिया, पाहा असं केलं तरी काय?

लाइव्ह चॅटवेळी सलमानच्या वागण्यामुळं लाजून गुलाबी झाली गर्लफ्रेंड युलिया, पाहा असं केलं तरी काय?

लाइव्ह चॅट सुरू असताना सलमाननं कसं काही केलं की गर्लफ्रेंड यूलिया लाजून गुलाबी झाली.

  मुंबई, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊन सर्वजण घरी बसले आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा आपापल्या घरी राहून लॉकडाऊन पाळत आहेत. अभिनेता सलमान खान सुद्धा मागच्या काही काळापासून त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊनवर अडकला असून लॉकडाऊनमुळे त्याला त्याच्या वडीलांपासून दूर राहावं लागत असल्याची खंत त्यानं एका व्हिडीओमध्ये बोलून दाखवली होती. सलमान सध्या त्याच्या चाहत्यांनी सतत घरी राहून स्वतःची काळजीकरण्याचं आवाहन करताना दिसत आहे. पण सध्या सोशल मीडियावर सलमान आणि त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ यूलियाच्या लाइव्ह चॅटवेळीचा आहे आणि त्यावेळी सलमाननं कसं काही केलं की यूलिया लाजून गुलाबी झाली. सलमान खानच्या फॅनपेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सुरुवातीला दिसतं की, यूलिया लॅपटॉपसमोर लाइव्ह चॅट करत आहे. ती खूपच सीरियस मूडमध्ये बोलताना दिसत आहे. अशात सलमान खान मागून येतो आणि मुद्दाम तिच्या स्क्रिनवर वाकून बघतो. त्याच्या चेहऱ्यावर खूपच फनी एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. यूलियाला सुरुवातीला तर काही समजत नाही. मात्र जसं तिच्या लक्षात येतं तशी ती चकित होते. मात्र तोपर्यंत सलमान निघून जातो. VIDEO : प्रियांका चोप्रा करत होती Instagram Live, मागून निकनं केलं असं काही की..
  सलमानची हे वागणं पाहून यूलिया आधी हसते आणि मग हातामागे चेहरा लपवत ती लाजताना दिसते. गर्लफ्रेंड यूलियाच्या लाइव्ह चॅटमध्ये सलमानचं हे विनोदी वागणं बघून चाहत्यांना हसू आवरत नाही आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. सलमान सध्या लॉकडाऊन दरम्यान त्याच्या अर्ध्या कुटुंबासह पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे तर त्याचे भाऊ आणि वडील मुंबईमध्ये अडकले आहे. सलमान लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत आहे आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांमध्येही जागरुकता निर्माण करण्याचं काम करत आहे. 'ए कोहली पोछा मार ना...' विराट-अनुष्काच्या Video वर बनले मीम्स मुलाच्या बर्थ डे कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, पाहा VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Salman khan

  पुढील बातम्या