मुंबई, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे नेहमीच बीझी राहणाऱ्या सेलिब्रेटींकडे सुद्धा सध्या बराच रिकामा वेळ आहे. त्यामुळे सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना आणि सर्वांना घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पती सोबत अमेरिकेत आहे. मात्र ती सुद्धा इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह चॅटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. पण अशात मागून निकनं असं काही केलं की, त्याच्या वागण्याचा प्रियांकाला राग आला. प्रियांका चोप्राचा हा व्हायरल व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या एका इन्स्टाग्राम फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यात तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत आहे. यामध्ये प्रियांका बोलताना दिसते की, मला माहित आहे हा खूप कठीण काळ आहे. आपण आपल्याकडून जे होऊ शकत आहे ते प्रत्येकजण करत आहे. एवढ्यात तिच्या मागून निक जोनस किचनमध्ये जातो आणि तिथलं भांडं खाली पडतो. भांडं खाली पडल्याचा आवाज प्रियांकाच्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे.
प्रियांका हा आवाज ऐकून विचलित होते. काही सेकंदांसाठी तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो. प्रियांकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती निक जोनस नाही आहे. मात्र तिच्या फॅनपेजवर मात्र ही व्यक्तीनिक जोनस असल्याचं बोललं जात आहे.