'ए कोहली पोछा मार ना...' विराट-अनुष्काच्या Video वर बनले मीम्स

नुकताच विराट-अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात अनुष्का विराटच्या चाहत्याची नक्कल करताना दिसत होती.

नुकताच विराट-अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात अनुष्का विराटच्या चाहत्याची नक्कल करताना दिसत होती.

  • Share this:
    मुंबई, 18 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली इतर सेलिब्रेटींप्रमाणे लॉकडाऊनचे नियम पाळताना दिसत आहेत. दोघंही सध्या एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. दरम्यान दोघंही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सर्वांना लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. पण नुकताच विराट-अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात अनुष्का विराटच्या चाहत्याची नक्कल करताना दिसत होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का टपोरी अंदाजात कोहली, 'ए कोहली, चौका मार ना, क्या कर रहा है.' असं बोलताना दिसली होती. जे ऐकल्यावर विराटनं तिला अजब लुक दिला होता. आता याच व्हिडीओवर सोशल मीडियावर एक मीम्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अनुष्काचा आवाज मॉर्फ करण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी अनुष्का, 'ए कोहली, कोहली, पोछा मार ना पोछा, कढ़ाई धो ली.' असं म्हणताना दिसत आहे. 'संजीवनी कोणी आणली होती?' सोनाक्षीच्या उत्तरानं झाली सर्वांची बोलती बंद
    या व्हिडीओमध्ये अनुष्का पुढे म्हणते, 'छौंका मार, मसूर की दाल का साथ में चावल बनाइयो' अनुष्का विराटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. स्वप्नील जोशी 19 एप्रिलची आतुरतेनं पाहतोय वाट, हे आहे कारण
    अनुष्कानं काल विराटच्या चाहत्याची मिमिक्री करतानाचा एक व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, 'मला वाटतं तो सध्या त्याचं क्रिकेट खूप मिस करत आहे. त्याला ग्राऊंडवर असताना मिळणार प्रेक्षकांचं प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळणारं प्रेम आणि खास करुन अशा टाइपचे चाहते... म्हणून मी त्याला घरीच हा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.' मलायकाशी लग्नाचा काय प्लान आहे? चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुनचं धम्माल उत्तर
    First published: