जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी दुबईत मोकळेपणाने फिरू शकतो पण...'; Y+ सिक्युरिटी विषयी पहिल्यांदा बोलला भाईजान

'मी दुबईत मोकळेपणाने फिरू शकतो पण...'; Y+ सिक्युरिटी विषयी पहिल्यांदा बोलला भाईजान

salman khan y+ security

salman khan y+ security

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर सलमाननं स्वत:साठी बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 मे:  बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या धमकी प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच सलमान खाननं एक बेधडक मुलाखत दिली. ज्यात त्यानं अनेक विषयांवर आपली स्पष्ट मतं मांडली आहेत. ज्यात धमक्यांपासून, बुलेट प्रूफ गाडीस, बाप बनण्यापासून ते दुबई सेफ आणि भारत सेफ नसणं अशा अनेक मुद्दांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेटविषयी देखील सलमान स्पष्ट बोलला. ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी त्याला काय वाटतंय हे देखील त्यानं सांगितलं. सलमान खानला लहान मुलं फार आवडतात हे सर्वांना माहिती आहे. सलमान खानला मुलांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर सलमान म्हणाला, मी स्वत:च्या मुलांचा प्लान केला होता. पण भारतीय कायद्यानुसार मला असं करण्यासाठी परवानग नाही. त्यामुळे मला आता हे कसं करता येईल? मी यासाठी काय करू शकतो  हे पाहावं लागेल. हेही वाचा - Salman Khan: लग्न न करताच सलमानला व्हायचं होतं बाप; खुलासा करत म्हणाला ‘मला मुलांची खूप आवड होती पण…’ \ ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी बोलताना सलमान म्हणाला, मला वाटतं की ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेटवर सेन्सॉरशिप लावण्यात यावी. सिनेमात एॅक्शन सीनमध्ये आम्ही दोन पंच जास्त मारतो तेव्हा आमचा सिनेमा A सर्टिफाइड होतो. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर काहीतरी वेगळेच एँक्शन सीन्स सुरू असतात आणि तिथे मात्र A, B, C असे कोणतेच सर्टिफिकेट नसतात.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनेता सलमान खानला धमक्यांचे फोन आल्यापासून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याला महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.  सलमाननं स्वत:साठी बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली आहे. या विषयी बोलताना सलमान म्हणाला, मी जिथेही जातो तिथे माझी संपूर्ण सिक्युरिटी सोबत असते. मी दुबईत मोकळेपणाने फिरू शकतो. दुबई सर्वात सुरक्षित आहे. पण भारतात काही तरी प्रोब्लेम आहे. सलमान खानचा किसीका भाई किसीकी जान हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान काही दिवसांसाठी दुबईत गेला होता. दुबईत असलेल्या भारतीयांनी आणि बॉलिवूड प्रेमींनी सलमानचं स्वागत केलं. दुबईत फिरतानाचा तो अनुभव सलमाननं यावेळी सर्वांबरोबर शेअर केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात