मुंबई, 30 एप्रिल: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, ‘किसी का भाई किसी की जान’ची कथा प्रेक्षकांना फारशी प्रभावित करू शकली नाही. दुसरीकडे, सलमान खान ने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नुकतेच काही खुलासे केले आहेत. एका मुलाखतीदरम्यान सलमान म्हणाला की, तो खूप दिवसांपासून वडील बनण्याचा विचार करत आहे आणि त्याला मुलांवर खूप प्रेम आहे. याशिवाय सलमानने त्याच्या लग्नाबद्दलही सांगितले आहे. सलमान खानने केलेल्या या वक्तव्यांची आता चर्चा होत आहे. सलमान खान आजवर अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिप मध्ये होता मात्र त्याची ही नाती फार काळ टिकली नाहीत. यामध्ये बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांची नावे अग्रणी आहेत. या अभिनेत्रींसोबत त्याच्या लग्नाच्याही चर्चा सुरु होत्या. पण ही नाती फार काळ टिकली नाही. अजूनही सलमान खान सिंगलच आहे. नुकतंच त्याच नाव किसी का भाई किसी कि जान फेम अभिनेत्री पूजा हेगडे सोबतही जोडलं गेलं होतं. पण यात काही तथ्य नव्हतं. आता इंडिया टीव्हीला दिलेल्या आपल्या मुलाखतीत सलमानने त्याला एका मुलाचा बाप व्हायचं होतं असा खुलासा केला आहे. या मुलाखतीत सलमान म्हणाला की, त्याने एकदा मूल होण्याचा विचार केला होता, पण भारताचा कायदा त्याला परवानगी देत नाही.
सलमान खानचे मुलांवर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या छायाचित्रांमध्ये काही छायाचित्रे आहेत, ज्यामध्ये सलमान आपल्या भाच्यांसोबत नेहमी वेळ घालवताना दिसतो. सलमानची बहीण अर्पिता शर्मा हिला आयत शर्मा आणि अहिल अशी दोन मुले आहेत. सलमानची दुसरी बहीण अलविरा खान हिलाही अलीझेह आणि अयान नावाची दोन मुले आहेत. त्याचबरोबर सलमानचे भाऊ सोहेल आणि अरबाज यांनाही मुले आहेत. Abhishek Bachchan: ऐश्वर्याच्या चाहत्याने अभिषेकला दिला हा सल्ला; संतापून अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खान मुलाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना म्हणाला- ‘आता काय सांगू, तो प्लान होता, तो बायकोचा नव्हता, पण मुलाचा होता. पण, भारताच्या कायद्यानुसार असे होऊ शकत नाही, त्यामुळे आता काय करायचे ते पाहू. याशिवाय करण जोहर दोन मुलांचा पिता असल्याबद्दल सलमान खान म्हणाला, ‘मीही तसाच प्रयत्न करत होतो पण तो कायदा कदाचित बदलला आहे, त्यामुळे आता बघू. मला मुलांची खूप आवड आहे. मला मुलं आवडतात. पण मुलं आली की आई पण येते. आई त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. आई आमच्या घरी पडली आहे साहेब! आमच्याकडे संपूर्ण जिल्हा, संपूर्ण गाव आहे, ती त्याची चांगली काळजी घेईल, परंतु त्याची आई, जी खरी आई असेल, ती माझी पत्नी असेल.