मुंबई, 26 जून : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यातील खास बँडिग आता सर्वांनाच माहीत झालं आहे. सलमानसाठी त्याच्या वडीलांचा शब्द नेहमीच शेवटचा असतो. हे दोघंही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. या दोघांकडे बॉलिवूडमधील बेस्ट वडील आणि मुलगा म्हणून पाहिलं जातं. नुकताच सलमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या वडीलांचा रोमँटिक गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला. ज्यात पुन्हा एकदा या दोघांमधील खास बाँडिंग पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हयरल होत आहे. आदित्य पांचोली प्रकरणात साक्ष द्यायला पोलीस ठाण्यात पोहोचली कंगना रणौत सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ नुकताच शेअर केला. ज्यात त्याचे वडील सलीम खान गाणं गाताना दिसत आहेत आणि सलमान त्यांना साथ देताना दिसत आहे. याशिवाय यावेळी सलीम आणि सलमान यांच्यासोबत कमाल खान सुद्धा दिसत आहेत. सलीम खान, ‘सुहानी रात ढल चुकी है…’ हे गाणं गात आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना सलमाननं त्याला, ‘माझ्या फॅमिलीचे सुलतान, टायगर आणि भारत… गाणं गात आहेत.’असं कॅप्शन दिलं आहे. चाहत्यावर भडकली तापसी पन्नू, म्हणाली- ‘फोन ठेव नाही तर फोडून टाकेन'
सलमानचा भारत सिनेमा नुकताच ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. मात्र या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलीम खान यांनी पुढाकार घेतला होता. ते अनेक प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमान सोबत दिसले. कपिल शर्मा शो मध्ये सलमाननं त्याच्या वडीलांचा एक किस्सा शेअर केला होता, ज्यामध्ये त्यानं त्याच्या वडीलांकडून त्याला खूप ओरडा पडला होता असं सांगितलं होतं. सलमाननं सांगितलं, आमच्या घरी सामान्यपणे एकमेकांच्या चप्पल घालतो, एकदा मला बाहेर जायचं होतं आणि मी बाबांची चप्पल घालून गेलो. त्यावेळी ते बाथरुममध्ये होते. मात्र बाहेर आल्यावर त्यांना त्यांची चप्पल मिळाली नाही त्यावरून ते मला खूप ओरडले. ‘कबीर सिंह’च्या मेकर्स विरोधात तक्रार दाखल, स्क्रिनिंगवर बंदी घालण्याची मागणी
आता सलमानच्या भारत सिनेमाबद्दल बोलायचं तर या सिनेमानं 200 कोटीचा आकडा पार केला आहे. या सिनेमात सलमान सोबत कतरिना कैफ दिसली होती. यानिमित्त नुकतीच सलमानचा भाऊ अरबाज खाननं सक्सेस पार्टी दिली होती. ज्यात सलमान त्याची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत दिसला. मात्र या सर्वात सलमानचं शर्ट यूलियाच्या हातात दिसल्यानं पार्टीपेक्षा त्या शर्टचीच चर्चा जास्त झाली.
============================================================== VIRAL FACT : या विचित्र हास्यामागे दडलंय काय? हे आहे सत्य