आदित्य पांचोली प्रकरणात साक्ष द्यायला पोलीस ठाण्यात पोहोचली कंगना रणौत

आदित्य पांचोली प्रकरणात साक्ष द्यायला पोलीस ठाण्यात पोहोचली कंगना रणौत

kangana ranaut aditya pancholi कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी पलटवार करत वर्सोवा पोलीस ठाण्याला पत्र लिहिलं. यात रिजवान यांनी आदित्य पांचोली प्रकरणावर अनेक मुद्दे उपस्थित केले.

  • Share this:

मुंबई, 25 जून- अभिनेता आदित्य पांचोलीवर बलात्कार आणि अत्याचाराचे गंभीर आरोप करणारी अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. या प्रकरणी आदित्य पांचोलीने पोलीस ठाण्यात तक्रार करत कंगना आणि रंगोलीवर खोटे आरोप करण्याचे आणि जाणीवपूर्वक अडकवण्याचा दावा केला होता. दरम्यान, आज कंगना आणि तिच्या बहिणीला अंधेरी न्यायालयाने २६ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण त्याआधी कंगना मंगळवारी मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात आपली साक्ष देण्यासाठी पोहोचली.

गाडीत बसताना फोटोग्राफर काढत होता दीपिकाचे फोटो, ती म्हणाली, ‘ये आता आत बस...’

कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी पलटवार करत वर्सोवा पोलीस ठाण्याला पत्र लिहिलं. यात रिजवान यांनी आदित्य पांचोली प्रकरणावर अनेक मुद्दे उपस्थित केले. यात त्यांनी आदित्यशी रोखठोक राहण्याची गरज असून ज्या मोबाइल फोनवरून आदित्यने स्टिंग करण्याचा एक तर्फी दावा केला आहे तो मोबाइल जप्त करण्यात यावा. यामुळे स्टिंगचं पूर्ण फुटेज समोर येईल आणि खरं काय ते साऱ्यांनाच कळेल.

या पत्रात वकिलांनी हेही लिहिले की, कंगनासोबत आदित्यने किशोरवयीन वयात यौन शोषण केले. याबद्दल कंगनानेही अनेक मुलाखतीत भाष्य केलं आहे. जेव्हा न्यायालयात हे प्रकरण जाण्याची वेळ आली तेव्हा आदित्य पांचोलीच्या वकिलांनी हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्यासाठी रिजवान यांना बोलावले होते.

पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया

राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

First published: June 25, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading