मुंबई, 25 जून : शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘कबीर सिंह’ सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि त्यानंतर अवघ्या चार दिवसातच या सिनेमानं 88.37 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार असल्याचं चित्र आहे. मात्र मुंबईतील एका डॉक्टरने या सिनेमाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली असून याविषयीची तक्रारही त्यानं पोलिसांकडे दाखल केली आहे. निमित्त होतं ‘भारत’च्या सक्सेस पार्टीचं पण, चर्चा मात्र भाईजानच्या शर्टचीच
एकीकडे प्रेक्षक ‘कबीर सिंह’चं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काही डॉक्टर्स असं म्हणणं आहे की, या सिनमामध्ये शाहिद कपूरनं एका सनकी आणि अग्रेसिव्ह डॉक्टरची भूमिका साकारून डॉक्टर्सना चुकीच्या पद्धातीनं दाखवल्याचा दावा करत या डॉक्टर्सनी सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या सिनेमामुळे डॉक्टर्सच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त स्वास्थ्य मंत्री, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, स्वास्थ्य राज्य मंत्री यांनी सेंसॉर बोर्डला पत्र लिहून या सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता रिअल लाइफमध्ये करतेय टप्पूला डेट?
शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘कबीर सिंह’ हा सिनेमा मूळ तेलुगू सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा ऑफिशिअल हिंदी रिमेक आहे. यात शाहिदनं प्रेमात वेड्या झालेल्या एका सनकी प्रियकराची भूमिका साकारली आहे. जो डॉक्टर असूनही प्रेमभंग झाल्यानंतर स्वतःला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन संदिप वांगा यांनीच केलं आहे. या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणीनं शाहिदच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. अभिनेता वरुण धवन ‘या’ दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत
================================================================== SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल