हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. धर्मेंद्र सोबत लग्न झाल्यानंतर हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून नेहमीच अंतर राखलं. 40 वर्षांनंतरही त्यांनी त्यांचं वचन तोडलं नाही.
नुकतंच धर्मेंद्रचा नातू करण देओलचं लग्न झालं तेव्हा हेमा आणि ईशा देओलच्या अनुपस्थितीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. यामुळे धर्मेंद्र दु:खी झाले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे माफी मागितली.
आता हेमा मालिनी यांनी स्वतः या प्रकारावर मौन सोडलं आहे. त्यांनी धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुलींसाठी काही केलं ते सांगितलं आहे.
हेमा मालिनी यांनी 'लेहरेन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'धर्मेंद्र त्यांच्या दोन मुली ईशा आणि आहाना यांच्या लग्नामुळे खूप चिंतेत होते. मुलींना चांगली मुले मिळतील की नाही याची काळजी त्यांना नेहमीच असायची. ते नेहमी आमच्यासोबत होते.
'मुलींची लग्नं लवकर झाली पाहिजेत असं ते म्हणायचे. पण मी म्हणायचे योग्य व्यक्ती योग्य वेळी येईल. देव आणि गुरूंच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य झाले.' असं हेमा म्हणाल्या आहेत.
धर्मेंद्र अलीकडेच चर्चेत होते जेव्हा त्यांनी हेमा मालिनी आणि दोन मुली अहाना आणि ईशा यांना सोशल मीडिया पोस्टमध्ये वैयक्तिकरित्या कॉल करू शकत नसल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते तसंच नातू करण देओलच्या लग्नाला आमंत्रित न केल्याबद्दल माफी मागितली होती. करण देओल हा सनी देओलचा मुलगा आहे. गेल्या महिन्यात 18 जून रोजी त्याने लग्न केले. हेमा आणि त्यांच्या दोन्ही मुली लग्नाला पोहोचल्या नाहीत.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 'शोले', 'सीता और गीता' 'किनारा' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. दुसऱ्या एका मुलाखतीत हेमाने तिचे लग्न असामान्य असल्याचे सांगितले. माझे लग्न सामान्य पद्धतीने झाले असते तर कदाचित मी आयुष्यात इतके काही करू शकले नसते, असे ते म्हणाले होते. मी चित्रपट केले आहेत, टॉक शोला जाते, राजकारण करते. माझे सामान्य जीवन असते तर हे सर्व घडले असते का?' असं त्या म्हणाल्या.