लॉकडाऊनमध्ये आपल्या LOVE सोबत नाश्ता करताना दिसला सलमान, पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये आपल्या LOVE सोबत नाश्ता करताना दिसला सलमान, पाहा VIDEO

सलमाननं असाच एक ब्रेकफस्ट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या Love सोबत दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊ सुरू आहे. त्यामुळे सध्या सर्वजण घरीच आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान सुद्धा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर सध्या त्याचा लॉकडाऊनचा काळ घालवत आहे. अनेकदा तो तिथले व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. आताही सलमाननं असाच एक ब्रेकफस्ट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या Love सोबत दिसत आहे. सलमानचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

आपल्या लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सलमाननं आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या प्रेमाचा खुलासा अखेर केला आहे. त्यानं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यानं लिहिलं, ‘Breakfast With My Love’ सलमानचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या घोड्याला हिरवी पानं खायला देताना दिसत आहे.

Lockdownमध्ये करिनाला आली बीचची आठवण, शेअर केला Bikini Photo

 

View this post on Instagram

 

Breakfast with my love...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानचा हा व्हिडीओ सर्वाधिक होण्याचं कारण म्हणजे, या व्हिडीओत स्वतः सलमान सुद्धा घोड्यासोबत हिरवी पानं खाताना दिसत आहे. सलमानच्या या व्हिडीओ त्याचे चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. खास करुन सोशल मीडियावर सलमानच्या कॅप्शनची चर्चा होताना दिसत आहे. याशिवाय याआधी त्यानं कब्रस्तानाचे फोटो शेअर केले होते जे खूप व्हायरल झाले होते.

एका सर्जरीमुळे होत्याचं नव्हतं झालं, छोट्याशा चुकीनं अभिनेत्रीचं करिअरच संपलं

 

View this post on Instagram

 

Be Home n Be Safe @nirvankhan15

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर सलमाननं त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुद्धा थांबवलं आहे. याशिवाय सरकार कडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करुन तो मागच्या बऱ्याच दिवसांपासून घरी आहे आणि चाहत्यांनाही घरी राहण्याचं आवाहन करताना दिसत आहे. याशिवाय सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या 16 हजार कामगाराच्या पोटोपाण्याची प्रश्न निर्माण झाल्यावर त्यानं तत्काळ त्यांना मदतीचा हातही दिला. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवलं जाण्याची शक्यता आहे.

(संपादन- मेघा जेठे.)

550 दिवस... लाखो रुपयांचा खर्च... 33 वर्षांपूर्वी असं झालं होतं 'रामायण'चं शूट

First published: April 10, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading