

बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात आणि जातात. काही हिट होतात. तर काहींना कमी काळातच बाय बाय करावं लागतं. पण या अभिनेत्रीमध्ये काहीतरी वेगळं होतं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


पदार्पणातच बेस्ट डेब्यू फिल्मफेअर, अजय देवगण,सलमान खान यांसारख्या सुपरस्टार सोबत काम करुन एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होऊनही या अभिनेत्रीचं बॉलिवूड करिअर अचानक संपलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


ही अभिनेत्री आहे आयशा टाकिया. आज तिचा 34 वा वाढदिवस. नावाजलेली अभिनेत्री असतानाही एका सर्जरीमुळे तिचं संपूर्ण करिअरच संपून गेलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


आयशा टाकियानं टिनेज लव्हस्टोरी ‘टार्झन : द वंडर कार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


वयाच्या 15 वर्षीच बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी आयशा तिच्या फिल्मी करिअरसोबतच वेगवेगळ्या वादांमुळे जास्त चर्चेत राहिली. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


2009 मध्ये समाजवादी पार्टीचे नेता अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केल्यानंतर आयशानं सिनेमात काम करणं कमी केलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


मागच्या बऱ्याच काळापासून दूर असलेल्या आयशानं मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. ज्यामुळे तिची जोरदार चर्चा झाली. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)


आयशानं लिप सर्जरी केली. ज्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले. मात्र तिच्या या सर्जरीनं तिचा चेहराच बिघडवून टाकला आणि आयाशाला जोरदार ट्रोल करण्यात आलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)