

33 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी ‘रामायण’ची निर्मिती केली. एक असा टीव्ही शो जो सुरू झाल्यावर देशातल्या रस्त्यांवर शूकशूकाट होत असे.


रामायणमध्ये काम करत असलेल्या कलाकरांची लोकप्रियता त्यावेळी एवढी वाढली होती की हे कलाकार जिथे जातील तिथे लोक त्यांची पूजा करु लागले होते.


रामानंदन सागर यांनी 80 च्या दशकात जेव्हा रामायणचं शूटिंग सुरू केलं होतं त्यावेळी ते म्हणावं तेवढं सोपं अजिबात नव्हतं. त्यात सिनेदिग्दर्शकानं टीव्ही शो करणं कोणाला फारसं आवडलं नव्हतं.


रामानंद सागर यांनी जेव्हा रामायणची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना स्पॉन्सर करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्यांनी फंड गोळा करण्याचा प्रयत्न केला पण त्यातही फारसं यश मिळालं नाही.


रामानंद यांचा मुलगा प्रेम सागर सांगतात, बाबानी हार कधीच मानली नाही कारण रामायण, कृष्णा आणि दुर्गा यासारख्या मायथोलॉजिकल शोची निर्मिती करण्याचा त्यांचा निश्चय ठाम होता.


रामायणसाठी स्पॉन्सर मिळत नव्हते याचं कारण होतं की, त्यावेळी मिशी आणि मुकूट ही संकल्पना फारशी काम करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे मग रामानंद यांनी 1986 मध्ये ‘विक्रम वेताळ’ची निर्मिती केली आणि हा शो हिट झाला.


विक्रम वेताळ सिपरहिट झाल्यानंतर रामानंद सागर यांच्या प्रॉडक्शन कंपनीला स्पॉन्सर मिळायला सुरुवात झाली. विक्रम वेताळच्या एका एपिसोडसाठी जवळपास 1 लाखांचा खर्च आला होता.


मात्र रामायणाच्या एका एपिसोडसाठी 9 लाख रुपये खर्च येत होता. 33 वर्षांपूर्वी ही रक्कम नक्कीच लहान नव्हती. त्यावेळी हा शो सर्वात महागडा शो ठरला होता.


रामायणचं प्रसारण झालं आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. रामायण हा जगभरात सर्वाधिक लोकांनी पाहिला गेलेला शो आहे. जगभरात 650 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा शो पाहिला आहे.


रामायण हा सुरुवातील 52 एपिसोडचा शो होता. मात्र त्याची लोकप्रियता पाहता त्याला तीन वेळा एक्सटेंड करुन या शोचे 78 एपिसोड टेलिकास्ट करण्यात आले.