

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर नेहमीच तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. लॉकडाऊनमुळे सध्या करिना घरीच आहे. (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)


काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एंट्री केल्यानंतर करिना सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. ती इन्स्टाग्रामवर वर्कआउट, सैफ आणि तैमुरसोबतचे फोटो शेअर करताना दिसत आहे. (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)


टाइमपास करण्यासाठी बॉलिवूडस्टार वेगवेगळे उपाय शोधत आहे. पण करिना मात्र लॉकडाऊनमध्येही तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेताना दिसत आहे. (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)


पण लॉकडाऊनमध्ये असताना करिनाला सध्या बीच व्हेकेशनचे वेध लागलेले दिसत आहेत. कारण तिनं नुकताच एक बीच साइड फोटो सोशल मीडियावर शेअर केला जो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)


करिना कपूरनं बीच वरील एक बोल्ड बिकिनी फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिच्यासोबत सैफ आणि तैमुर सुद्धा दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी बीच बद्दल विचार करत नाही आहे... तुम्ही?’ (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)


करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात करिनानं पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)


लवकरच करिना बॉलिवूडची मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. (फोटो : करिना कपूर इन्स्टाग्राम)