मुंबई, 19 एप्रिल : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसनं सध्या जगभरात थैमान घातलं आहे. अनेक लोकांचा या व्हायरसमुळे जीव गेला आहे. सध्या भारतातही या व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं असून बॉलिवूड सेलिब्रेटींनाही यामुळे सिनेमांचं शूटिंग थांबवावं लागलं आहे. अशात बरेच सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोना व्हायरसबाबत जागरुकता निर्माण करण्याचं काम करताना दिसत आहे. अशात आता अभिनेता सलमान खाननं कोरोना व्हायरसवर चक्क गाणंच लिहून टाकलं असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सलामान खाननं त्याच्या या गाण्याचा टिझर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या गाण्याचे बोल प्यार करोना असे असून या गाण्यातून कोरोना बाबत जागरुकता करण्याचा प्रयत्न सलमाननं केला आहे. या गाण्याचा टीझर शेअर करताना सलमाननं सांगितलं की, हे गाणं उद्या त्याच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं जाणार आहे. टीझर शेअर करताना सलमाननं लिहिलं, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, उद्या माझ्या युट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज केलं जाईल. आशा आहे की तुम्हाला हे आवडेल. रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे लातूरऐवजी अडकला या ठिकाणी, Video मुळे झाला खुलासा
या गाण्याला संगीत साजिद नाडियावालानं दिलं असून हे गाणं स्वतः सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी लिहिलं आहे. गाण्याच्या टीझरमध्ये #IndiaFightsCorona #StayHomeStaySafe #BeHuman हे हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आले आहेत. या गाण्याचं विशेष म्हणजे सलमाननं हे गाणं घरी राहूनच शूट केलं आहे. सलमान खान मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यानं आतापर्यंत कोरोना जागरुकतेसाठी अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. सध्या सलमाननं त्याच्या अर्ध्या फॅमिलीसह पनवेल मधील त्याच्या फार्म हाऊसवर अडकला आहे. त्याच्यासोबत त्याच्या दोन्ही बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, गर्लफ्रेंड यूलिया वंतूर, सोहेल खानचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र आणि स्टाफसह 22 माणसं या फार्म हाऊसवर अडकली आहेत. तर त्याचे आई-वडील मात्र मुंबईमध्ये आहेत. फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का? पाहा पाक मीडियाचं अर्धवट ज्ञान, अभिनेता आमिर खानलाच म्हटलं आरोपी