किरण मोहिते, प्रतिनिधी मुंबई, 19 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. देशात लॉकडाऊन केल्यानं अनेकजण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. यात अगदी सामान्य व्यक्तीपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. काहीजण तर त्यांच्या कुटुंबापासून दुरावले आहेत. तर काही आपल्या घरापासून दूर कुठेतरी अडकून पडले आहेत. असंच काहीसं झालं आहे बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखसोबत. रितेश देशमुख सध्या आपल्या कुटुंबासह गेल्या एक महिन्यापासून आपल्या पाहुण्यांकडे लॉकडाऊनमुळे अडकून पडला आहे. 20 मार्च रोजी चार दिवस हवापालट करण्यासाठी रितेश कराडमध्ये आला होता मात्र कोरोनामुळे अचानक लॉक डाऊन करण्यात आले आणि अतुल भोसले यांच्या उत्तरा भवन बंगल्यावर रितेश आपल्या पत्नी जेनेलिया आणि मुलं राहिल-रिहान सोबत अडकला आहे. असं असलं तरी तो आपल्या कुटुंबासह लॉकडाऊनचं पालन करताना आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. पाहा पाक मीडियाचं अर्धवट ज्ञान, अभिनेता आमिर खानलाच म्हटलं आरोपी
रितेश लॉकडाऊनमध्ये असला तरी त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला आहे. सकाळी व्यायाम, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिझनेसचं कामकाज पाहणं, अशी सगळी काम तो नियमित करत आहे. याशिवाय तो चक्क बायको जेनेलियाला घरकामात मदत करतो काही दिवसांपूर्वी त्याचा असाच एक भांडी घासतानाचा टीक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘जॉली एलएलबी 2’ नंतर अर्शद वारसीनं अक्षय कुमारवर काढला होता राग, काय होतं कारण
कराडमध्ये राहणारे अतुल भोसले यांचे भाऊ विनूबाबा यांच्यासोबतचे रितेशचे काही टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे कराडमध्ये अडकल्याचे समोर आलं. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. याशिवाय त्याचे टिक टॉक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. लाइव्ह चॅटवेळी सलमानमुळे लाजून गुलाबी झाली यूलिया, पाहा असं केलं तरी काय?