मुंबई, 19 एप्रिल : पाकिस्तानी मीडियाच्या अर्धवट ज्ञानाचे किस्से तर सर्वांनाच माहित आहेत. अनेकदा चुकीची माहिती दिल्यानं पाकिस्तानी मीडिया सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होतं असतं. नेहमीच आपल्या निष्काळजीपणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पाकिस्तानी मीडियानं आता आमिर खानच्या नाव घेत अशी काही चूक केली आहे की आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर एका आरोपीच्या जागेवर चक्क अभिनेता आमिर खानचा फोटो दाखवण्यात आला. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या न्यायालयानं 17 वर्षांनंतर राजकीय पार्टी मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की (MQM) चा नेता आमिर खानची दुहेर हत्या प्रकरणातून मुक्तता केली. मात्र हे वृत्त चॅनेलवर दाखवताना मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की (MQM) चा नेता आमिर खानच्या जागी बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो लावून टाकला. पाकिस्तानी मीडियावर हे अर्धवट ज्ञान पुन्हा एकदा समोर आलं असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. लाइव्ह चॅटवेळी सलमानमुळे लाजून गुलाबी झाली यूलिया, पाहा असं केलं तरी काय?
पाकिस्तानी मीडियाच्या या चुकीनंतर पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण या चुकीची खिल्ली उडवताना दिसत आहे. काही क्षणांनंतर चॅनेलनं आपली चूक सुधारली पण तोपर्यंत त्याचे स्क्रिनशॉट मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. युजर्स सध्या सतत अभिनेता आमिर खानचा फोटो वापरुन चालवलेल्या ब्रेकिंगवरुन या न्यूज चॅनेलची खिल्ली उडवताना दिसत आहेत. माधुरीच्या मुलाने तिच्या साथीने गिरवले नृत्याचे धडे, पाहा VIDEO
दरम्यान अभिनेता आमिर खाननं सध्या या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमिरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच लाल सिंह चढ्ढा या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंप या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात करिना कपूर आमिरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सिनेमांचं प्रदर्शन रखडलं आहे. VIDEO : प्रियांका चोप्रा करत होती Instagram Live, मागून निकनं केलं असं काही की..